Fake Corona Positive Report
Fake Corona Positive Report File Photo
ग्लोबल

धक्कादायक! शाळेला दांडी मारण्यासाठी मुलेच तयार करताहेत कोरोनाचा फेक रिपोर्ट

सुशांत जाधव

शाळेला दांडी मारण्यासाठी मुले काय शक्कल लढवतील याचा नेम नसतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच वेळापत्रक पूर्णत: कोलमडल्याचे पाहायला मिळाले. कोरोनातून सावरून परिस्थितीत पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसते. दरम्यान ब्रिटनमधील (Britain) शालेय विद्यार्थांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्रिटनमध्ये शाळेला दांडी मारण्यासाठी मुले चक्क कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट तयार करत आहेत. (Fake Corona Positive Report) काही TikTok व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीये. वेगवेगळ्या लिक्विडचा वापर करत मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा कांगावा करत असल्याचा खुलासा झालाय. (Teenagers in UK are Fake Corona Positive Report using lemon juice and other hacks from TikTok)

यॉर्कशायर इव्हिनिंग पोस्चच्या वृत्तानुसार, मुले कोरोना टेस्ट किट (Corona Test Kit) वर लिंबूचा रस किंवा द्राक्षांचा रस टाकून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह करत आहेत. ब्रिटनमधील शालेय विद्यार्थी Rapid Diagnostic Test (RDT) वेळी हा फंडा वापरुन आपला फेक कोरोना रिपोर्ट तयार करत आहेत. शाळेला दांडी मारण्यासाठी मुलांनी लढवलेली शक्कल धक्कादायक अशीच आहे.

सोशल मीडियावर #fakecovidtest या हॅशटॅगखाली सातत्याने व्हिडिओ अपलोड करण्यात येत आहेत. याच नावाने एक TikTok अकाउंटही सक्रीय आहे. या अकाउंटची फॉलोअर्स संख्या 20 हजारहून अधिक आहे. या व्हिडिओमध्ये लिंबू रस, अ‍ॅपल सॉस, कोका कोला, द्राक्षांचा रस आणि सॅनिटायझरच्या माध्यमातून रॅपिड एंन्टीजन टेस्ट करत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी ही शक्कल शाळेला दांडी मारण्यासाठी लढवली आहे.

असोसिएशनने पालकांना केलं सावध

असोसिएशन ऑफ स्कूल अ‍ॅण्ड कॉलेज लीडर्सचे जनरल सेक्रेट्री जिओफ बार्टन (Geoff Barton) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलीये. विद्यार्थी कोरोना रिपोर्टसंदर्भात करत असलेली धक्कादायक बाब आमच्या निदर्शनास आलीये. माफक विद्यार्थी असा प्रकार करत आहते. पालकांना आम्ही याबाबत सूचना दिलीये. मुलांकडून विनाकारण टेस्ट किटचा वापर होऊ नये, याची खबरदारी घ्या, असा सल्ला पालकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

TikTok चीही प्रतिक्रिया

टेस्ट किटवर आम्ली पदार्थाचा वापर करुन एंटिजन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो, असे UK तील Fact Check संस्थेने म्हटले आहे. दुसरीकडे TikTok Spokesperson ने कोरोनासंदर्भात भ्रम पसरवणारी माहिती प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात येते, अशी माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT