thailand 
ग्लोबल

Accident Day: घात-अपघाताचा दिवस! जगात दिवसभरात घडल्या भीषण घटना, 74 जणांचा मृत्यू

लंडन, थायलंड, नेपाळ, उत्तराखंड, त्रिपुरा इथं थरारक दुर्घटना घडल्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आजचा दिवस जगभरात घात-अपघाताचा दिवस ठरला. भारतातील शहरांसह जगातील विविध ठिकाणी भीषण आणि थरारक स्वरुपाच्या घटना घडल्या. यामध्ये सुमारे 74 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कुठे घडलेत हे अपघात जाणून घेऊयात. (terrible accidents happened around world during the day 58 people died)

https://aninews.in/news/world/asia/thailand-shooting-death-toll-hits-34-including-22-kids20221006145125/

थायलंड इथं सकाळी एक थरारक घटना घडली यामध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यानं लहान मुलांच्या शाळेत अर्थात नर्सरीत गोळीबार केला. यामध्ये एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये २२ चिमुकल्यांचा समावेश होता. या भीषण घटनेनं अवघ जगचं हादरलं.

https://aninews.in/news/world/asia/16-killed-in-bus-accident-in-bara-district-of-nepal20221006172707/

त्याचबरोबर नेपाळच्या बारा जिल्ह्यात झालेल्या एका बस अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. लंडनमधील लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनमध्ये एका माथेफिरुनं तीन जणांना भोसकलं.

https://aninews.in/news/world/europe/three-stabbed-near-liverpool-street-station-in-central-london-police20221006163651/

तर भारतातील उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील द्रोपदी डिंडी 2 या हिमशिखरावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिमस्खलनात अनेक प्रशिक्षणार्थी बेपत्ता झाले होते. यांपैकी १६ जणांचे मृतदेह आत्तापर्यंत हाती आले आहेत. हे सर्व मृतदेह उंचावरील ठिकाणाहून खाली आणले जात आहेत.

त्याचबरोबर तामिळनाडूतील त्रिपूर इथं एका खासगी अनाथालयात जेवणातून विषबाधा झाल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला तर ८ जण आजारी पडले आहेत. पण या घटनेतील मृत्यू नक्की कशामुळं झाले हे तपासणीनंतरच कळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अनाथालयावर गुन्हाही दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT