Terrorist Attack on School in Kabul  esakal
ग्लोबल

Afghanistan : काबुलमधील शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार

अफगाणिस्तानमधील एका शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमधील एका शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे.

काबूल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला (Terrorist attack) झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून यात बहुतांश शालेय विद्यार्थ्यांचा (School Students) समावेश आहे. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून हा हल्ला केला. या घटनेत आतापर्यंत 35 जण जखमी झाले आहेत.

काबूलच्या पश्चिमेकडील दश्ते बरची येथील एका शैक्षणिक संस्थेवर हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांतानं हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये बहुतांश हजारा आणि शिया समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. याआधी एप्रिलमध्ये काबूलमधील दोन शैक्षणिक संस्थांमध्ये स्फोट झाले होते, त्यात सहा जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते.

या दोन्ही शाळा काबूलच्या दश्ते बरची भागात आहेत. अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी आपल्या ट्विटमध्ये या हल्ल्याची माहिती दिली आहे. वतन रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालयात अनेक मृतदेह असल्याची पुष्टी केलीय. सरवरी म्हणाले, 'परिसरातील एका समुदायाच्या नेत्यानं मला सांगितलं की मी आतापर्यंत 24 मृतदेहांची मोजणी केली आहे. त्यापैकी बहुतांश मृत तरुण विद्यार्थी होते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT