Terrorist attack sakal
ग्लोबल

Terrorist attack : पाकच्या हवाई दलावर दहशतवादी हल्ला

आत्मघाती हल्लेखोरांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र बाळगलेल्या नऊ दहशतवादी मियांवलीमधील पाकिस्तानी हवाई दलाच्या (पीएएफ) तळावर घुसले.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मियांवली हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर नऊ सशस्त्र दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला. यात हवाई तळावर उभ्या असलेल्या काही विमानांचे नुकसान झाले आहे. यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या गोळीबारात सर्व दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

आत्मघाती हल्लेखोरांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र बाळगलेल्या नऊ दहशतवादी मियांवलीमधील पाकिस्तानी हवाई दलाच्या (पीएएफ) तळावर घुसले. यानंतर हवाई दलाने त्यांच्यावर गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी धुवाधार गोळीबार करण्यात आला. हवाई दलाने तातडीने मोहीम राबून नऊ दहशतवाद्यांना मारल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले. तळावर उभ्या असलेल्या, पण सेवेतून बाद केलेल्या तीन विमानांचे या हल्ल्यांत नुकसान झाले; मात्र अन्य कशालाही धक्का लागला नसल्याचे त्यांनी सांगितले

मियांवलीतील ‘पीएएफ’ प्रशिक्षण हवाई तळावरील शोध मोहीम पूर्ण झाली असून सर्व नऊ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले असल्याचे लष्कराने सांगितले. पाकिस्तानमध्ये काल तीन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १७ सैनिक ठार झाले. त्यानंतर लगेचच आज हवाई तळावर हल्ला झाला. तेहरिकी जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. आमच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्न तितक्याच जोरदारपणे परतवून लावला जाईल.

अन्वरूल हक काकर, काळजीवाहू पंतप्रधान, पाकिस्तान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT