tesla car owner blows high end 2013 model s sedan with 30 kg dynamite
tesla car owner blows high end 2013 model s sedan with 30 kg dynamite 
ग्लोबल

३० किलो डायनामाइटने उडवली ७५ लाखांची टेस्ला; कारण ऐकून व्हाल थक्क

सकाळ डिजिटल टीम

इलॉन मस्क (Elon Musk) यांची जगप्रसिध्द कार कंपनी टेस्ला (Tesla) त्यांच्या नवीन कल्पनांसाठी आणि लेटेस्ट तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. कंपनीने हाय परफॉर्मंस कार्सनी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) क्षेत्रातही वर्चस्व गाजवले आहे. परंतु अलीकडे, कंपनीची प्रतिष्ठा घसरली आहे कारण त्यांच्या ग्राहकांना कारमधील सॉफ्टवेअरमधील त्रुटी, सदोष ऑटोपायलट सेमी-ऑटोनॉमस ड्रायव्हर-असिस्ट सिस्टम आणि अशाच प्रकारच्या फीचर्समध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (tesla car owner blows high end 2013 model s sedan with 30 kg dynamite)

तांत्रिक दोष आणि त्यासाठी येणारा प्रचंड दुरुस्ती खर्च यामुळे संतापलेल्या, एका टेस्ला कार मालकाने त्याची महागडी इलेक्ट्रिक सेडान कार, 2013 टेस्ला मॉडेल एस (2013 Tesla Model S) डायनामाइटने उडवून दिल्याची घटना समोर आली आहे.

कंपनीचे मालक एलोन मस्क यांचे लक्ष वेधण्यासाठी 30 किलोपेक्षा जास्त डायनामाइट लावून त्याने स्वतःची हाय एंड कार उडवून दिली. फिनलंडमधील ट्यूमास काटेनेन यांने त्यांच्या कार बद्दल वाईट अनुभव आल्यानंतर आणि कंपनीच्या सर्व्हिस सेंटर केंद्राकडून कोणतीही मदत न मिळाल्याने हा निर्णय घेतला. अलीकडेच टेस्ला कंपनीला सॉफ्टवेअर, ऑटोपायलट, ड्रायव्हर-असिस्ट सिस्टमसह अनेक गोष्टींमधील दोषांमुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे.

2013 च्या टेस्ला मॉडेल एस इलेक्ट्रिक सेडानचे मालक Tuomas Katainen, इलेक्ट्रिक वाहन (EV) कंपनीच्या सेवेबद्दल निराश झाल्यानंतर त्यांची कार उडवून दिली आहे. वास्तविक, टेस्ला मॉडेल एसच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दिसणार्‍या मल्टीपल एरर कोडमध्ये एक दोष आढळला होता. त्यानंतर सेडान टेस्ला सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. एक महिना वाट पाहिल्यानंतर, कारच्या मालकाला EV कंपनीकडून माहिती मिळाली की संपूर्ण बॅटरी पॅक बदलल्याशिवाय सेडानची दुरुस्ती करता येणार नाही, ज्याची किंमत त्याला $22,480 ( 17,08,783 रुपये) लागेल.

कार सुमारे आठ वर्षे जुनी होती, त्यामुळे तिच्या बॅटरीसाठी कंपनीकडून कोणतीही वॉरंटी नव्हती. यामुळे दु:खी झालेल्या टेस्ला कारच्या मालकाने 30 किलो डायनामाइट लावून कार उडवली. कार मालकाने कारमध्ये स्फोट करण्यापूर्वी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची डमी देखील कारमध्ये ठेवली होती. स्फोटात कारचा काही भाग वाचला. टेस्ला कारमध्ये स्फोट करणारा तो कदाचित जगातील पहिला व्यक्ती आहे, असेही त्याने म्हटले नंतर सांगितले.

टेस्लाच्या कारला सर्व्हिस सेंटर व्यतिरिक्त इतर ठिकाणी सर्व्हिस करण्याची परवानगी नाहीये, त्यामुळे या इलेक्ट्रिक वाहनांच्या वॉरंटी कालावधी संपल्यानंतर त्यांच्या सर्व्हिसींगच्या खर्च मोठी चिंतेचा विषय ठरतो. टेस्लाची कारबाबत एक क्लोज इकोसिस्टम आहे आणि कार मालकासाठी खर्च कमी करण्यासाठी इतर कोणत्याही थर्ड पार्टी सर्व्हिसना परवानगी दिली जात नाही .

ही इलेक्ट्रिक कार भारतात 2022 मध्ये लॉन्च होऊ शकते. टेस्ला मॉडेल एस ची भारतातील अंदाजे किंमत 1.50 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. यूएस मध्ये या कारची किंमत $ 99,490 आहे, जी भारतीय रुपयांत 75 लाख रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT