Tesla India Executive Manuj Khurana esakal
ग्लोबल

Elon Musk ला मोठा धक्का; 'टेस्ला इंडिया'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

टेस्लाच्या एका प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येत आहे.

भारतात टेस्ला (Tesla) गाड्या कधी दाखल होतील आणि रस्ते कधी तुडुंब भरलेले दिसतील, हे आत्ताच सांगणं फार कठीण आहे. दरम्यान, टेस्लाच्या भारतात (Tesla India) प्रवेशासाठी कंपनीच्या वतीनं प्रयत्न करणार्‍या टेस्लाच्या एका प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येत आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन लोकांनी 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला ही माहिती दिलीय.

टेस्लाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिलेल्या अधिकाऱ्याचं नाव मनुज खुराना (Manuj Khurana) असल्याचं सांगण्यात येतंय. अहवालानुसार, काही काळापूर्वी टेस्लानं भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री सुरू करण्याची योजना पुढं ढकलली होती. त्यानंतरच मनुजनं कंपनीकडं आपला राजीनामा सुपूर्द केलाय.

मनुज खुराना हे भारतातील टेस्लाचं धोरण आणि व्यवसाय विकास कार्यकारी (Policy and Business Development Executive) म्हणून काम करत होते. खुराना हे मार्च 2021 पासून Elon Musk च्या टेस्ला कंपनीशी संबंधित आहेत. यादरम्यान त्यांनी टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारला भारतात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. खुराना यांनी भारत सरकारला टेस्ला वाहनांवरील आयात शुल्क 100 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सांगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT