ग्लोबल

चोरालाही एसीचा मोह आवरेना; चोरी करायला गेला अन्..

शर्वरी जोशी

कोणत्याही गोष्टीचा मोह कधी करु नये असं कायमच म्हटलं जातं. मोहापायी अनेकांना मोठ्या संकटांचा सामनादेखील करावा लागला आहे. असाच काहीसा प्रकार थायलँडमध्ये घडला आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेला एक चोर त्याच्या मोहापायी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे हा चोर पैसा, दागदागिने या कशाचाही मोह न करता एका वेगळ्याच मोहात पडला आणि याच कारणामुळे त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. त्यामुळे सध्या या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

थायलँडमध्ये हा प्रकार घडला असून चोरी करायला गेलेला एक चोर चक्क चोरी केल्यानंतर त्याच घरात झोपी गेला. त्याच्या याच चुकीमुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

२२ वर्षीय चोराने घरात चोरी केल्यानंतर तो निघण्याच्या तयारी होता. मात्र, त्यापूर्वी घरातील एसी आणि बेड पाहून त्याला झोपेचा मोह आवरला नाही. त्यामुळे तो तेथेच झोपला. पहाटे या घराचे मालक आल्यानंतर त्यांनी चोराला झोपलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्यात क्षणी या चोराची चोरी पकडली गेली.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा चोर घरातील एका बेडरुममध्ये झोपला होता. ही बेडरुम घरमालकांच्या मुलीची होती. सकाळी या घर मालकांनी पाहिलं तर त्यांच्या मुलीच्या बेडरुमचा एसी सुरु होता. विशेष म्हणजे त्यांची मुलगी घरी नसतांनादेखील एसी सुरु कसा काय हा प्रश्न घर मालकांना पडला. त्यामुळे त्यांनी मुलीच्या बेडरुममध्ये डोकावून पाहिलं तर, हा चोर चक्क तिच्या बेडरुममध्ये झोपला होता. त्यानंतर या चोराला अटक करण्यात आली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''कॅमेऱ्याचा एँगल नाही, हृदयाचा एँगल बदला'', भर सभागृहात प्रियंका गांधींकडून मोदींवर बोचरी टीका; नेमकं काय म्हणाल्या?

Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

Kasari Green Revolution: कासारी गावातील ओसाड गायरानात १००० रोपांची लागवड; ५००० झाडांचे लक्ष्य, ठिबक सिंचनासह हरित क्रांतीचा संकल्प

Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

SCROLL FOR NEXT