Thailand esakal
ग्लोबल

थायलंडमध्ये 45 देशांसाठी 'Quarantine Free'ची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

थायलंडनं (Thailand) 45 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या देशाची दारं पुन्हा उघडण्यास सुरुवात केलीय.

नवी दिल्ली : थायलंडनं (Thailand) 45 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या देशाची दारं पुन्हा उघडण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे, या देशांतील लोकांना थायलंडमध्ये क्वारंटाइन फ्री (Quarantine Free) एन्ट्री दिली जाणार असून त्यांना एक दिवसही क्वारंटाइन करावं लागणार नाही, असं स्पष्ट केलंय. खरं तर, थायलंडच्या सर्वात महत्वाच्या पर्यटन क्षेत्राला कोरोना महामारीमुळं (Coronavirus) प्रचंड नुकसानाला सामोरं जावं लागलं, त्यामुळं देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडलीय. अशा स्थितीत, येथील सरकारनं निवडक 45 देशांतील लोकांसाठी क्वारंटाइन फ्री प्रवेशाची घोषणा केलीय, जेणेकरून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

थायलंडनं 45 देशांची यादी नुकतीच जाहीर केलीय. कॅनडा, सिंगापूर आणि चीनसह 42 देशांची नावं या यादीत आहेत. मात्र, भारताचं नाव त्यात समाविष्ट केलं गेलं नाही. सप्टेंबरमध्ये थायलंडनं 'फुकेत सँडबॉक्स' कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय प्रवाशांसाठी आपले दरवाजे पुन्हा उघडले. मात्र, तेव्हापासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.

45 देशांच्या यादीत कोणत्या देशांचा समावेश?

टाट न्यूजच्या (Tat News) वृत्तानुसार, 45 देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बहरीन, बेल्जियम, भूतान, ब्रुनेई, दारुस्सलाम, बुल्गारिया, कंबोडिया, कॅनडा, चिली, चीन, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी यांचा समावेश आहे. तसेच आइसलँड, आयर्लंड, इस्रायल, इटली, जपान, लातव्हिया, लिथुआनिया, मलेशिया, माल्टा, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्लोव्हेनिया, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात, यूके, यूएसए आणि हाँगकाँगचा देखील समावेश करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT