काय सांगताय! 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई esakal
ग्लोबल

काय सांगताय! 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई

लहानपणापासूनचे होते स्वप्न

सकाऴ वृत्तसेवा

क्रिस्टीना तिच्या दैनंदिन जीवनाची माहिती इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.

रशियात राहणारी क्रिस्टीना ओझटर्कने वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर नुकतेच 10 महिन्यात 10 सरोगेट बाळांना जन्म दिला आहे. क्रिस्टीना ही दहाव्या सरोगेटपासून ती आणि तिच्या पतीने मिळून तब्बल 21 बाळांना जन्म दिला आहे. त्यामुळे ती सध्या 21 मुलांची आई बनली आहे. तिच्या या 21 मुलांना सांभाळण्यासाठी तिने चक्क 16 आया ठेवल्या आहेत.

ओझटर्क जॉर्जियाच्या गॅलिपमधील एका करोडपतीची क्रिस्टीना पत्नी आहे. हिने मागील वर्षी मार्च ते या वर्षी जुलै महिन्यात सरोगेट्समध्ये पालक होण्यासाठी 1,46,78,156 रुपये खर्च केले आहे. क्रिस्टीना ही मूळची रशियाची आहे. क्रिस्टीना घरात राहणाऱ्या 16 आयांवर ती दरवर्षी 72,08,265 रुपये खर्च करतेय. झपाट्याने वाढणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आया 24 तास काम करतात. त्यांच्या कु़टुंबामध्ये क्रिस्टीना तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसह एकूण 23 मुलांसोबत एकाच घरामध्ये राहतात.

यावेळी बोलताना क्रिस्टीनाने सांगितले की, मी प्रत्येकवेळी मुलांसोबत असते, प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी करते, तेच काम मी ही करते. मी लहान असल्यापासून हे स्वप्न पाहतेय. माझ्या पतीनेही पहिल्यापासून आपले एक मोठे अन् आनंदी कुटुंब असावे, असे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे आम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणलो आहोत.

क्रिस्टीना तिच्या दैनंदिन जीवनाची माहिती इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला 1,60,000 लोक फॉलो करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT