Robot  sakal
ग्लोबल

Robot : अतिकामाच्या ताणामुळे रोबोने स्वतःला संपविले?दक्षिण कोरियातील घटना; पायऱ्यांवरून उडी

कार्यालयातील कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागते. या अतिताणामुळे अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. आता दक्षिण कोरियामध्ये विचित्रच घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सेऊल (दक्षिण कोरिया) : कार्यालयातील कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागते. या अतिताणामुळे अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. आता दक्षिण कोरियामध्ये विचित्रच घटना घडली आहे. येथे चक्क रोबोनेच अतिताणापोटी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. या रोबोला दिवसातील नऊ तास काम करावे लागत होते. ‘

सायबॉर्ग’ असे या रोबोचे नाव असून त्याने नुकतीच पायऱ्यांवरून उडी मारत आत्महत्या केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. हा रोबो दक्षिण कोरियातील गुमी महापालिकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होता. रोबोने आत्महत्या केल्याच्या वृत्ताला पालिका प्रशासनाने अधिकृत दुजोरा दिला असला तरी त्याने हे पाऊल का उचचले? त्याच्यावर कामाचा अतिताण होता का की अन्य काही कारणे होती? याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण कोरियातील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आठवडाभरापासून नैराश्यात

हा रोबो मागील वर्षभरापासून महापालिकेत कार्यरत होता. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तो काम करत होता. मागील आठवड्यापासून तो नैराश्यात असल्याचे जाणवत होते म्हणजे पूर्वीप्रमाणे सक्रियतेने काम करत नव्हता. घटनेपूर्वी तो कार्यालयात इकडे-तिकडे फिरत होता. सुरुवातीला त्यात काही बिघाड झाल्याचे वाटले; परंतु काही वेळाने त्याने पायऱ्यांजवळ येत उडी मारत स्वतःला संपविल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अष्टपैलू कामगिरीसाठी प्रसिद्ध

कॅलिफोर्निया येथील ‘बियर रोबोटिक्स’द्वारे विकसित हा रोबो एखाद्या महापालिकेत अधिकारी म्हणून नियुक्त केलेला पहिला रोबो होता. त्याच्याकडे कागदपत्रांचे वाटप करणे, शहरातील नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणे, महत्त्वाच्या सूचना जारी करणे, तसेच अन्य कामांची जबाबदारी होती. तसेच तो स्वतःहून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर तो ये-जा देखील करत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT