Flight carrying 240 Indians from hungary has taken off for Delhi  टिम ई सकाळ
ग्लोबल

Ukraine Russia War : हंगेरीमधून भारताकडे तिसरे विमान रवाना

आतापर्यंत दोन विमाने भारतामध्ये दाखल झाली आहेत. तर आज तिसरं विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून दिल्लीला येण्यासाठी रवाना झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या तीन दिवसापासुन युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. या युद्धाने जगाच्या पाठीवर चिंता वाढवली आहे. रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्याने युक्रेन मधील जनजीवन विस्कळले आहेत. अशात युक्रेन वर असलेला धोका पाहता तेथे अडकलेले लोक युक्रेनमधुन बाहेर पडण्यासाठी केविलवानी धडपड करीत आहे. यात पार्श्वभुमीवर काही भारतीय विद्यार्थी यांना माघारी आणण्यासाठी भारत सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत दोन विमाने भारतामध्ये दाखल झाली आहेत. तर आज तिसरं विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून दिल्लीला येण्यासाठी रवाना झाले आहे. या विमानात एकूण 240 भारतीय नागरिक प्रवास करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनची हवाई वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे त्यामुळे या विद्यार्थांना हंगेरी आणि रोमानियामध्ये आणून नंतर विमानाने भारतात आणले जात आहे. शनिवारी एक विमान भारतात दाखल झाले तर आज पहाटे देखील एक विमान भारतामध्ये आले आहे. हे विमान 250 प्रवाशांना घेऊन दिल्लीत दाखल झाले. आतापर्यंत एकूण 469 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून माघारी आणण्यात यश आले आहे. तर आज आणखी एक विमान 240 भारतीय नागरिकांना घेऊन हंगेरीतील बुडापेस्टमधून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहे. हंगेरी हा मध्य युरोपातील एक देश असुन हंगेरीच्या पूर्वेला युक्रेन देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT