Isreal Hamas War sakal
ग्लोबल

Israel Hamas War: 'आम्हीही कोलमडण्याच्या स्थितीत'; युद्धापुढे हतबल झालं संयुक्तराष्ट्र

सकाळ डिजिटल टीम

Israel War Latest Update:  पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचे गाझा पट्टीतही कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मोठे मदतकार्य चालते. मात्र, इसाईल- हमास यांच्यातील संघर्ष वाढत चालला असल्याने त्यांच्याकडेही बचावसाहित्याची कमतरता भासत असून 'आम्हीही कोलमडण्याच्या स्थितीत आहोत' असे त्यांनी म्हटले आहे. गाझा पट्टीत काम करणाऱ्या ‘यूएन’ला शव झाकून ठेवणाऱ्या बॉडीबॅगचाही तुटवडा भासत आह

इस्त्राईलने हल्ले सुरु केल्यापासून गाझा पट्टीतील दहा लाखांहून अधिक जणांना आपले घर सोडून निघून जावे लागले आहे. इस्त्राईलच्या लष्कराकडून जमिनमार्गे हल्ला होण्याची टांगती तलवार कायम असल्याने सामान्य नागरिकांचे स्थलांतर अद्यापही सुरुच आहे. अन्न-पाण्याच्या कमतरतेमुळे या नागरिकांचे अत्यंत हाल होत असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.

इस्राईलने उत्तर गाझामधील लोकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घर सोडून निघून जात आहेत. आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यापैकी किमान पाच लाख नागरिक संयुक्त राष्ट्रांनी उभारलेल्या शाळांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आश्रयाला आहेत.

इस्त्राईलने गाझा पट्टीचा वीज, पाणी आणि इंधन यांचा पुरवठा थांबविला असून युद्धामुळे अन्नाचाही तुटवडा आहे. त्यामुळे स्थलांतरितांना पाण्याची आणि अन्नाची प्रचंड कमतरता भासत आहे. संयुक्त राष्ट्रांकडून मदत पुरविण्याचा प्रयत्न सुरु असला तरी इस्त्राईलच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे सर्व जणांपर्यंत मदत पोहोचविणे अवघड असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.

इस्त्राईलने केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील २,६७० नागरिकांचा मृत्यू झाला असून ९,६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्त्राईलकडून उत्तर गाझामध्ये हवाई हल्ले सुरुच असून त्यांनी हमासशी संबंधित अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. गाझा पट्टीच्या सीमेवर इस्राईलने आपले सैन्य सज्ज ठेवले असले तरी हल्ला कधी करणार, ते जाहीर केलेले नाही. या हल्ल्यामुळे मृतांची संख्या अनेक पटींनी वाढेल, असा इशारा मानवतावादी संघटनांनी दिला आहे. या संघर्षात इस्राईलचेही १,४०० जण मारले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT