Gurpatwant Singh Pannun 
ग्लोबल

'खलिस्तानी अतिरेकी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीयाविरोधात आरोपपत्र'; अमेरिकेचा गंभीर आरोप

खलिस्तानी नेता आणि अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने एका भारतीय व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- खलिस्तानी नेता आणि अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने एका भारतीय व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अमेरिकेच्या अॅटोर्नी कार्यालयाने बुधवारी सांगितलं की, निखील गुप्ता नावाच्या एका भारतीयाने शीख फॉर जस्टिसचा संस्थापक पन्नू याच्या हत्येचा कट रचला होता.

52 वर्षीय निखील गुप्ता यांच्यावर अमेरिकेने पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेरिकेने दावा केला होता की त्यांच्या भूमिकेवर अमेरिकी नागरिक आणि भारतीय वंशाच्या पन्नू याच्या हत्तेचा कट रचला जात आहे.

नवी दिल्लीतून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (The US Justice Department has charged Indian national Nikhil Gupta with involvement in an alleged murder plot against Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun)

अमेरिकेने कोर्टातील एक कागदपत्राचा दाखला दिला आहे. भारतीय सरकारी अधिकारी इतर काहींसोबत मिळून भारत आणि इतर देशात कट रचत आहेत. त्यांचा न्यू यॉर्कमध्ये राहत असलेला अतिरेकी पन्नू याचा खात्मा करण्याचा प्लॅन आहे, असं या कागदपत्रांमध्ये म्हणण्यात आलंय.

दरम्यान, निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये तणावाची स्थिती आहे. गुरपतवंत सिंह पन्नू याने भारतावर आगपाखड सुरु केली आहे. तसेच कॅनडासह पन्नूने निज्जरच्या हत्येसाठी भारत सरकारला दोषी ठरवलं आहे. पन्नूने अनेकदा भारतात हल्ले करण्याची धमकी दिली आहे. भारतामध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT