ग्लोबल

अमेरिका आणखी दोन कोटी डोस पुरविणार; बायडेन यांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : अमेरिका जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लशींचे आणखी दोन कोटी डोस पुरविणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी सांगितले आहे. विकसनशील आणि गरीब देशांना ६ कोटी डोस पुरविणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना बायडेन म्हणाले की,‘‘पुढील सहा आठवड्यांमध्ये आम्ही जगाला लशींचे (Corona Vaccine) एकूण आठ कोटी डोस पुरविणार आहोत. हे प्रमाण अमेरिकेत होणाऱ्या लस उत्पादनाच्या १३ टक्के इतके आहे. इतक्या प्रमाणात कोणत्याच देशाने लशी पुरविल्या नसून आतापर्यंत सर्वाधिक लशी पुरविणाऱ्या देशाच्याही पाच पट अधिक लशी अमेरिका देणार आहे. चीन आणि रशियानेही आतापर्यंत दीड कोटी देणगी म्हणून दिल्या आहेत.’’ चीन आणि रशियाने लशीच्या माध्यमातून जगावर प्रभाव टाकल्याचे बोलले जात असले तरी या क्षेत्रातही अमेरिकाच (America) सर्वांत पुढे असल्याचे आम्ही दाखवून देऊ, असे बायडेन यांनी सांगितले. (The US will provide another two crore corona doses Bidens announcement)

ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या सहा कोटी लशी चार जुलैपर्यंत जगभरात वितरीत करणार असल्याचे अमेरिकेने आधीच जाहीर केले होते. आता आज दोन कोटी लशींबाबत घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये ॲस्ट्राझेनेका, मॉडर्ना, फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी विकसीत केलेल्या लशींचा समावेश असेल.

भारताला मदत सुरुच ठेवणार

कोरोनाविरोधातील लढाईत भारत हा महत्त्वाचा भागीदार देश असल्याने त्यांच्या संकटाच्या काळात त्यांना मदत करणे आम्ही सुरुच ठेवणार असल्याचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले. भारताला १० कोटी डॉलर मूल्याचे वैद्यकीय साहित्य पुरविण्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Kolhapur Crime : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; कात्यायनी मंदिर परिसरात उसाच्या शेतात नेऊन...

PM Narendra Modi : पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा अन् रणनीती बदला, मी मार्गदर्शन करतो; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन

टीव्हीवरचे बहिण-भाऊ खऱ्या आयुष्यात झाले नवरा बायको! मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो चर्चेत

Devendra Fadnavis: ''निवडणूक आयोगाचं चुकलं, कुणाचा सल्ला घेतात माहिती नाही'' मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप

SCROLL FOR NEXT