Ukraine Russia war Esakal
ग्लोबल

Russia Ukraine War: युद्ध रशिया-युक्रेनचे, जीव जातोय नेपाळी तरुणांचा; आणखी 16 जणांना गमवावे लागले प्राण

Nepali Youth: नेपाळने आधीच स्पष्ट केले आहे की, ते आपल्या नागरिकांना फक्त त्याच परदेशी सैन्यात भरती होण्यास परवानगी देते ज्यांच्याशी त्यांचे द्विपक्षीय करार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन वर्षांपूर्वी सरू झालेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. दरम्यान, नेपाळी तरुणही रशियन सैन्यात दाखल झाले आहेत. पण सध्या सुरू असलेल्या युद्धात नेपाळी तरुणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत 16 नेपाळी तरुणांना युक्रेनच्या लष्कराशी लढताना जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंत रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या नेपाळी तरुणांची संख्या 33 वर पोहोचली आहे. वास्तविक, नेपाळ सरकारने भारतीय सैन्यात गोरखांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे तरुण रशियात जाऊन तेथील लष्करात भरती होत आहेत.

दरम्यान नेपाळी तरुणांच्या मृत्यूप्रकरणी नेपाळ सरकारने तातडीने कारवाई केली आहे. नेपाळ सरकारने रशियाला आपल्या तरुणांना माघारी पाठवण्याची विनंती केली आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मारले गेलेल्या नेपाळींच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने गोळा केले जात आहेत. हे नमुने तरुणांचे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी रशियाला पाठवले जातील.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नेपाळने आधीच स्पष्ट केले आहे की, ते आपल्या नागरिकांना फक्त त्याच परदेशी सैन्यात भरती होण्यास परवानगी देते ज्यांच्याशी त्यांचे द्विपक्षीय करार आहेत.

सरकारने यापूर्वी दोन स्वतंत्र नोटीस जारी करून आपल्या नागरिकांना कॉन्सुलर व्यवहार विभागाकडून 'ना हरकत' पत्र मिळाल्याशिवाय रशियाला जाऊ नये असे सांगितले होते.

दरम्यान 200 हून अधिक तरुणांच्या कुटुंबांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या संरक्षणासाठी कॉन्सुलर विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या नेपाळी तरुणांच्या कुटुंबियांच्या वतीने स्थापने केलेल्या संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या कीर्ती भंडारी यांनी अलीकडेच आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, 620 हून अधिक नेपाळी रशियन सैन्यात भरती झाले आहेत. आतापर्यंत 116 नेपाळी जखमी, 274 बेपत्ता आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

IPL 2026 News: "हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवा... रोहित शर्माकडे Mumbai Indians चं नेतृत्व पुन्हा सोपवा"

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT