युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा आज चौदावा दिवस असून अद्याप तरी कोणताही निर्णायक तोडगा निघाला नाहीये. या युद्धामुळे जसं युक्रेनचं अतोनात नुकसान झालंय त्याचप्रमाणे इतर देशही अनेक अर्थाने येत्या काळात अडचणीत येणार आहेत. रशियाने केलेल्या या आक्रमणाबाबत त्यांना धडा शिकवण्यासाठी तसेच त्यांच्या कृतीबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी रशियावर बंदी लादली आहे. तसेच अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी आणि ब्रँड्सनी रशियावर बहिष्कार घातला आहे. याचाही दूरगामी आर्थिक फटका रशियाला बसणार असून या मार्फत रशियाची कोंडी करण्याचा जागतिक प्रयत्न होतो आहे. आतापर्यंत कोणकोणत्या विख्यात कंपन्यांनी रशियाला बहिष्कृत केलंय, त्याची माहिती आपण घेऊयात... (Pepsi, Coca-Cola & McD suspending their business in Russia)
ऑईल आणि गॅस
BP Plc ही कंपनी रशियातील सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूकदार कंपनी आहे. त्यांनी आपली बरीचशी गुंतवणूक कमी केली आहे. Shell Plc, Equinor ASA आणि Exxon Mobil Corp. या कंपन्यांनी रशियाच्या आक्रमणाचा निषेध केला असून त्यांनी आपली भागीदारी संपुष्टात आणली आहे.
फायनान्स
Visa Inc. and Mastercard Inc. यांनी आपली सेवा स्थगित केल्याची घोषणा 5 मार्चला केली आहे. त्यानंतर American Express नेही यांच्यामागेच जाणं पसंत केलं. काही तज्ज्ञांच्या मते हे पाऊल अपुरं आहे. मात्र, या कंपन्यांनी म्हटलंय की, रशियामध्ये इश्यू केलेले कार्ड्स रशियात तसेच बाहेरही कार्यान्वित होणार नाही. पेपाल कंपनीनेही मंगळवारी आपली सेवा बंद केली आहे. Fitch Group आणि Moody’s Corp या कंपन्यांनीही हाच पवित्रा घेतला आहे.
ऑटोमोबाईल सेक्टर
General Motors Co., Ford Motor Co., Volkswagen AG, आणि Toyota Motor Corp. या बड्या कंपन्यांनी रशियात आपली उत्पादने पाठवणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. Volvo AB आणि Daimler Truck Holding AG या ट्रक उत्पादन कंपन्यांनीही आपल्या बिझनेस ऍक्टीव्हीटी थांबवल्या आहेत. मात्र, Renault SA ने अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाहीये.
कन्झ्यूमर गुड्स
McDonald’s, Coca-Cola आणि Starbucks Corp. या कंपन्यांनी तात्पुरत्या काळासाठी मंगळवारपासून आपली सेवा रशियात स्थगित केली आहे. PepsiCo Inc नेही आजच आपली सेवा स्थगित केली आहे. Samsung Electronics Co. ही रशियातील प्रमुख स्मार्टफोनची कंपनी देखील आपले सगळे प्रोडक्ट्स रशियामधअये पाठवणार नाहीये. Amazon.com Inc.नेही रशियावर बंदी घातली आहे. Microsoft ने 4 मार्च रोजी रशियाच्या आक्रमणाचा निषेध करत आपले प्रोडक्ट्स न पाठवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. Apple Inc.ने आपले आयफोन पाठवणे थांबवलं आहे. HP Inc नेही आपले कम्प्यूटर पाठवणं थांबवलं आहे. Nike Inc. ही यात सहभागी झाले आहे. Inditex SA सारख्या फॅशन रिटेलर कंपन्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मीडिया
Netflix Inc. सारख्या बड्या मीडिया प्लॅटफॉर्मने रशियावर बहिष्कार टाकला आहे. यासोबतच Walt Disney Co., Paramount Pictures, Sony Corp., WarnerMedia आणि Comcast Corp.’s Universal Pictures सारख्या हॉलिवूडच्या मीडिया हाऊसेसनही बहिष्कार टाकला आहे. Meta म्हणजेच फेसबुकनंतर TikTok या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेही आपली सेवा स्थगित केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.