Parag Agrawal Team eSakal
ग्लोबल

Twitterचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांना मिळेल तब्बल इतका पगार

अग्रवाल हे २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत.

स्वाती वेमूल

ट्विटर Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पराग अग्रवाल Parag Agrawal यांची नियुक्ती करण्यात आली. पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे 'सीटीओ' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ट्विटरचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अग्रवाल यांनी जॅक डॉर्सी Jack Dorsey यांची जागा घेतली आहे. 'मनी कंट्रोल' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अग्रवाल यांचा वार्षिक पगार आता १ दशलक्ष डॉलर्स इतका असेल. त्यासोबत बोनसही मिळेल, असं कंपनीने यु.एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे दाखल केलेल्या (SEC) फाइलिंगमध्ये म्हटलं आहे.

अग्रवाल यांना १२.५ दशलक्ष डॉलर्स मूल्याचे रेस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्सदेखील (RSUs) मिळतील. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला RSUs आणि PRSUs मिळाल्याचीही माहिती ट्विटरने दिली आहे. परंतु याविषयीचे कोणतेही विशिष्ट तपशील त्यांनी उघड केले नाहीत.

ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी २०१५ पासून वार्षिक पगाराव्यतिरिक्त मिळणारी नुकसान भरपाईची आणि फायद्याची रक्कम नाकारली होती. त्यांना १.४० दशलक्ष डॉलर्स इतका वार्षिक पगार मिळत होता. जॅक डॉर्सी यांनी सीईओपदाचा राजीनामा दिला असला तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. नुकतंच त्यांनी डिजिटल पेमेंट फर्म स्र्क्वेअरमध्ये Square शेकडो दशलक्ष किंमतीचे स्टॉक विकले आहेत. डॉर्सी यांनी २००९ मध्ये स्क्वेअरची सहस्थापना केली. डॉर्सी यांचे सध्या स्क्वेअरमध्ये सुमारे ११ टक्के आणि ट्विटरमध्ये सुमारे २.२६ टक्के शेअर्स आहेत.

अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट केलं. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटलं.

जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या 'सीईओ'पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, 'आयबीएम'चे अरविंद कृष्ण, 'अॅडोब'चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचंही नाव या यादीत समाविष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT