Hot month on Earth Sakal
ग्लोबल

Global Warming : यंदाचा सप्टेंबर सगळ्यात 'हॉट'; गेल्या १४३ वर्षांचा विक्रम मोडला!

यंदाचं वर्ष पृथ्वीवरचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण जगभरात यंदाचा सप्टेंबर महिना हा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवण्यात आला आहे. या महिन्यातलं तापमान जागतिक सरासरीच्या ०.८८ डिग्रीने जास्त होते. अमेरिकेतल्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर यंदाचा सप्टेंबर महिना पृथ्वीवरचा सर्वात उष्ण महिना ठरण्याचीही शक्यता आहे.

आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया, अटलांटिक आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलं आहे. यंदाचा सप्टेंबर महिना गेल्या १४३ वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया, मध्य युरोप आणि कॅरेबियन बेटांवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे तापमान सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा कमी झाल्याचं आढळून आलं आहे. गेल्या महिन्यात समुद्रातला बर्फही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. सध्या आर्क्टिक सागरामध्ये १.८८ दशलक्ष चौरस मैल बर्फ आहे.

बर्फाचे हे प्रमाण १९८१ ते २०१० या कालावधीतल्या बर्फापेक्षा कमी आहे. अंटार्क्टिकामध्ये सरासरीपेक्षा १.९० दशलक्ष चौरस मैल कमी बर्फ असल्याचं या अहवालात मांडण्यात आलं आहे. भारताचा काही भाग, उत्तर आशिया, युरोप, दक्षिण पूर्व पॅसिफिक महासागर या भागात गेल्या महिन्यात सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. या अहवालानुसार, २०२२ हे वर्ष आजपर्यंतच्या सर्वाधिक दहा उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. तर पहिल्या पाच सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT