Sami Sadat
Sami Sadat 
ग्लोबल

तालिबान विरोधातील लढ्यात अफगान कमांडरची का होतेय चर्चा?

कार्तिक पुजारी

तालिबान्यांच्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 60 हजारांपेक्षा अधिक कुटुंब बेघर झाले आहेत. आपल्याच देशात नागरिकांना सुरक्षित घराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे

काबूल- अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. तालिबान्यांच्या अत्याचाराविरोधात अफगान सैन्य संघर्ष करतंय. देशात लोकशाही सरकार टिकवून ठेवण्यासाठी अफगान सैन्य प्रयत्न करत आहे. तालिबान्यांच्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 60 हजारांपेक्षा अधिक कुटुंब बेघर झाले आहेत. आपल्याच देशात नागरिकांना सुरक्षित घराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच अफगान सैन्यातील युवा जनरल सामी सादात (Afghan general, Sami Sadat) नागरिकांसाठी एक आशेचा किरण बनले आहेत. 36 वर्षाचे सामी तालिबान्यांचा सर्व पातळ्यांवर सामना करत आहेत. (International Latest News)

तालिबान्यांनी अनेक प्रांत आपल्या ताब्यात घेतले आहेत. असे असले तरी अफगान सैन्य निकराचा लढा देत आहेत. तालिबानी दहशतवादी अफगान सैन्य शरणागती पत्करत असतानचे फोटो ट्विटरवर शेअर करत आहे. तालिबानी बळकावलेल्या भूभागाचे फोटो शेअर करताहेत. दुसरीकडे सामी सादात ट्विटर व्यासपीठाचा वापर करत लोकांचे मनोधैर्य वाढवत आहेत. सामी 215 व्या कॉर्प्सचे कमांडर आहेत. त्यांच्या कॉर्प्समध्ये 20 हजार सैनिकांचा समावेश आहे. सामी सादात ट्विटरवर सक्रिय आहेत. त्यांचे अनेक फॉलोवर्स आहेत. ते स्थानिक लोकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. स्थानिक दुकानदारांची भेट घेत असतात. बुधवारी अफगान सैन्याने ट्विट करुन माहिती दिलीये की, त्यांना प्रमोट करण्यात आलं आहे. ते आता देशाच्या स्पेशल फोर्सचे नेतृत्व करतील.

तालिबान दहशतवाद्यांना हरवणारच

तालिबान्यांनी मोठ्या भूभागावर ताबा मिळवला असला तरी, सादात यांनी हिंमत गमावलेली नाही. ते म्हणतात की, 'मला विश्वास आहे की शेवटी विजय आमचाच होईल. हा आमदा देश आहे. तालिबान अपयशी ठरत आहे आणि ते लवकरच पळून जातील.' सादात यांनी अफगाणिस्तानच्या हेरगिरी एजेन्सीमध्येही काम केले आहे. त्यांच्या एका सहकार्याच्या म्हणण्यानुसार, ते रणनीती आखण्यात तरबेज आहेत आणि कोणत्याही घटनेचे ते योग्य विश्लेषण करु शकतात.

सादात आहेत उच्चशिक्षित

सादात यांनी लंडनच्या किंग्स कॉलेजमधून पदवी घेतली आहे. त्यांनी आपल्या लष्करी करिअरची सुरुवात अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयातून केली होती. त्यांनी जर्मनी, ब्रिटेन, पोलंड आणि अमेरिका येथे ट्रेनिंग घेतली आहे. त्यांनी हेरगिरी विभागात काम केलंय. सादात यांनी तालिबान्यांना हरवण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी म्हटलंय की, लष्कर गाहमध्ये येणारा प्रत्येक तालिबानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात येईल किंवा त्यांना आयुष्यभर अपंग म्हणून राहावं लागेल. दरम्यान, सादात आणि त्यांचा परिवार दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT