World Health Organization
World Health Organization esakal
ग्लोबल

कोरोनानंतर आता 'मंकीपॉक्स'चा धोका वाढला; WHO कडून मोठा इशारा

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा धोका अजून असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजारानं चिंता वाढवलीय.

जिनिव्हा : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गानं थैमान घातलं आहे. अद्यापही जग कोरोना सारख्या महामारीमुळं झालेल्या नुकसानीतून सावरलं नाहीये. कोरोनाचा धोका अजून असतानाच आता मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या नव्या आजारानं चिंता वाढवलीय. स्थानिक नसलेल्या देशांमध्ये (ज्या ठिकाणी हा विषाणू बाहेरून आला आहे) त्याचा धोका वाढत आहे. बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) याबाबत इशारा दिला आहे.

मे'च्या पहिल्या आठवड्यात युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर या देशांत मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, 29 देशांमध्ये मंकीपॉक्सची 1,000 हून (Monkeypox Infection) अधिक पुष्टी झालेली प्रकरणं आढळून आली आहेत, जी या आजाराची स्थानिक नाही आहेत. मात्र, आतापर्यंत कोठेही मृत्यूशी संबंधित कोणतीही वृत्त नाही. स्थानिक नसलेल्या देशांमध्ये मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे हे सूचित करतात की विषाणूचा प्रसार झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम म्हणाले, संयुक्त राष्ट्राची आरोग्य एजन्सी विषाणूविरूद्ध मोठ्या प्रमाणात लसीकरणाची शिफारस करत नाही आणि उद्रेकामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. स्थानिक नसलेल्या देशांमध्ये मांकीपॉक्सचा धोका खरा आहे. जुनोटिक रोग 9 आफ्रिकन देशांमध्ये मानवांमध्ये स्थानिक आहे, परंतु गेल्या महिन्यात हा रोग इतर अनेक राज्यांमध्ये नोंदवला गेला आहे, त्यापैकी बहुतेक युरोपमध्ये आणि विशेषतः ब्रिटन, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये मांकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. यावेळी आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, मंकीपॉक्सचा विषाणू हवेतूनही पसरण्याची शक्यता आहे. नायजेरियात पसरलेल्या मंकीपॉक्सच्या संसर्गाचा संदर्भ देताना ते म्हणाले, 2017 मध्ये नायजेरियन तुरुंगात मंकीपॉक्स रोग पसरला होता. तिथं राहणाऱ्या कैद्यांशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांनाही याची लागण झाली होती. तसेच, जे लोक मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात आले नव्हते, त्यांनाही हा संसर्ग झाला होता. मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्ससारखाच दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळं होतो त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे, असं म्हणायला हरकत नाही. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. हा विषाणूचा त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: लखनौ - दिल्लीमध्ये अटीतटीचा सामना! केएल राहुलने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT