अंतराळयानाच्या व्हिडिओजची काही छायाचित्रे नासाकडून प्रसिद्ध करण्यात आली 
ग्लोबल

‘नासा’ने टिपला लँडिंगचा थरार

वृत्तसंस्था

केप कॅनव्हरल - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळावर उतरलेल्या अंतराळयानाचा एक उच्च दर्जाचा व्हिडिओ सोमवारी प्रसिद्ध केला आहे. या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पांढऱ्या आणि नारंगी रंगाचे पॅराशूट उघडलेले दिसत आहे. या रॉकेटचे इंजिन रोव्हरला घेऊन मंगळाच्या पृष्ठभागाच्या जवळ आल्यानंतर तेथील लाल मातीचा धुरळा उडताना दिसतो आहे. या व्हिडिओ फुटेजचा दर्जा अत्यंत चांगला असून छायाचित्रांचा दर्जा देखील उत्तम आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण या अंतराळ यानामध्येच बसलो आहोत की काय असा भास होतो,  असे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा व्हिडिओ खरोखरच थक्क करणारा असल्याचे नासाचे संशोधक डेव्ह ग्रुएल यांनी सांगितले. नासाचे पर्सिव्हरन्स हे रोव्हर गुरुवारी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरले होते. या ग्रहावरील सजीवसृष्टीचा वेध घेणे या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन लॅबरोटरीजने या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अंतराळ यानाने पाठविलेले व्हिडिओ आणि फोटो हे आमच्या स्वप्नाचे वास्तव रूप असल्याचे मत लँडिंग टीमचे प्रमुख अल चेन यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजय दिना पाटील शिंदेंच्या संपर्कात, हे उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, मनसेनच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update: वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवारपासून पूर्णपणे बंद

Ausa News : औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी डॉ. अफसर शेख

SSC Exam Result : स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

SCROLL FOR NEXT