ग्लोबल

‘मी अध्यक्ष होईन की नाही काळच ठरवेल’ 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आपण अध्यक्ष राहू की नाही हे काळच ठरवेल,’ असे सांगून स्वतःचा स्वर सौम्य केला आहे. ज्यो बिडेन यांच्याकडून पराभव मान्य न करण्याची भूमिका त्यांनी मवाळ केली असल्याचे सूचित झाले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोझ गार्डनमध्ये कोरोनाच्या एका लशीला मान्यता देण्यासंदर्भातल्या एका कार्यक्रमात ते अनौपचारिकत्या बोलत होते. ‘‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मी कधीही लॉकडाऊन जाहीर करणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही, कोणाचे प्रशासन असेल माहीत नाही. सगळे येणारा काळच ठरवेल,’’ असे वक्तव्य त्यांनी केल्याने त्यांनी विरोधाची तलवार म्यान केल्याचे मानले जात आहे. पराभव झाल्यानंतर जवळजवळ आठवडाभर त्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती आणि आपला पराभव हा कट असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, त्यांचे ताजे वक्तव्य हे एक प्रकारे पराभव मान्य करण्याची मानसिकता त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवर आपल्या समर्थकांचे आभार मानले आणि कदाचित मी भेटायलाही येऊ शकेन असे म्हटले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोझ गार्डनमधील कार्यक्रमानंतर ट्रम्प यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिला. ट्रम्प यांनी बराच काळ मौन बाळगले आहे. कॅमेऱ्यासमोर काही न बोलण्याचा त्यांचा हा सर्वांत मोठा काळ असल्याचे माध्यम विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकीबाबत वाद-प्रतिवाद, निदर्शने मात्र अजून सुरूच आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

ICC World Cup 2027 New Formats: वन डे वर्ल्ड कप २०२७, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ नव्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार; ICC ची घोषणा

आई मुलाखत झालीये, सकाळी घरी येतो; रात्री फोनवर बोलला, पुण्याहून परतताना पहाटे अपघातात मृत्यू

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

'तू भारतासाठी भरपूर केलंस...'; गौतम गंभीरचा 'हिटमॅन' रोहित शर्माला मॅसेज, India vs England मालिका शेवटची? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT