Russian Vodka_Ukraine war 
ग्लोबल

तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; गटारांमध्ये ओतला रशियन व्होडका!

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा जगभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

लास वेगास : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा (Russia invasion of Ukraine) जगभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. युक्रेनच्या लढ्याला अनेकांनी जाहीर पाठींबाही जाहीर केला असून रशियावर (Russia Ukraine War) अनेक निर्बंध आणण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेतील काही तळीरामांनी देखील युक्रेनच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. यासाठी त्यांनी अशी कृती केली आहे, त्यामुळं कधी नव्हे ते तुम्ही त्यांचं कौतुक कराल. (Tipplers pour vodka down the drain to support Ukrainian resistance efforts)

अमेरिकेतील लास वेगासमधील (Las Vegas) लोक रशियाच्या युक्रेनवरील आक्रमाणाला विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रशियन व्होडका विकत घेत आहेत. नंतर ते हा व्होडका गटारीमध्ये ओतून देत आहेत. मानवता टिकवण्याच्या युक्रेनच्या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून त्यांनी ही कृती केली आहे. विशेष म्हणजे लास वेगासमधील एका बारनं या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या व्होडकाच्या खरेदीतून जो पैसा जमा होणार आहे, तो पैसा युक्रेनच्या प्रयत्नांसाठी दान केला जाणार आहे. तसेच रशियन व्होडकाला पर्याय म्हणून युक्रेनिअन दारूची विक्री केली जात आहे.

रशियन व्होडका गटारातून ओतून देण्यासाठी लोक ३०० अमेरिकन डॉलर किंमतीपर्यंत व्होडका विकत घेत आहेत. त्यानंतर हा व्होडका ते गटारांमध्ये ओतून देत आहेत. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेचं मीडिया हाऊस फॉक्स बिझनेसच्या मते, लास वेगासच्या डाउनटाउनमधील इव्हेल पाईचे मालक ब्रॅंडन पॉवर्स म्हणतात, "रेड क्रॉसकडे जाणारी सर्व रक्कम नेमिरॉफ युक्रेनियन व्होडकाच्या पाच डॉलरच्या शॉट्ससाठी आपण जाहिरात सुरू केली आहे. जोपर्यंत पुतिन यांचा युक्रेनवर बेकायदा ताबा राहिल तोपर्यंत आम्ही हे करतच राहू," असंही पॉवर्स यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT