USA_Donald_Trump 
ग्लोबल

भारतीय आयटी व्यावसायिकांना मोठा धक्का? एच-१ बी व्हिसावर बंदी घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाच्या हालचाली

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीचा सर्वात मोठा परिणाम रोजगार क्षेत्रावर होत आहे. या व्हायरसमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेतील ट्रम्प सरकारनेदेखील एच-१ बी व्हिसावर अस्थायी स्वरुपात बंदी घालण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

ट्रम्प प्रशासनाच्या हालचालींचा थेट परिणाम भारतीयांवर होणार आहे. कारण एच-१ बी व्हिसा हा भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याच बरोबर विद्यार्थी व्हिसावरही तात्पुरती बंदी घालण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती शुक्रवारी (ता.८) एका अमेरिकन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. 

कोरोनाशी संबंधित विदेशातील घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

एच-१ बी व्हिसा हा एक गैरप्रवासी व्हिसा असून ज्यायोगे अमेरिकी कंपन्या एका विशिष्ट व्यवसायात परदेशी व्यावसायिकांची नेमणूक करू शकतात. भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये हा व्हिसा लोकप्रिय समजला जातो. या व्हिसाच्या आधारे सध्या अमेरिकेत ५ लाखाहून अधिक परदेशी लोक नोकरी करत आहेत. 

अमेरिकन वृत्तपत्र असलेल्या वॉलस्ट्रीट जर्नलने शुक्रवारी आपल्या बातमीत म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या महिन्याच्या इमिग्रेशन अफेअर्स अॅडव्हायझर संदर्भात योजना तयार करत आहेत. यानुसार, नवीन आणि तात्पुरत्या तसेच कामानिमित्त अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा आवश्यक असणाऱ्यांवर निर्बंध लागू करण्यात येतील, अशी शक्यता आहे. 

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आदेशात पुढे म्हटले आहे की, तांत्रिकदृष्ट्या कुशल असणाऱ्यांसाठी एच-१ बी व्हिसा आणि एच-२ बी (ठराविक कालावधीत काम करणाऱ्यांना हा व्हिसा देण्यात येतो) तसेच विद्यार्थी व्हिसामुळे मिळणाऱ्या सुविधांवर ट्रम्प सरकार आपले लक्ष्य केंद्रित करू शकते. 

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये ३.३ कोटींहून अधिक अमेरिकी नागरिकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तेथील अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकने अमेरिकेचा विकास दर शून्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता वर्तविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण सामान्य होईपर्यंत कंत्राटी कामगारांना देण्यात येणारा अस्थायी व्हिसाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी या खासदारांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अमेरिकेत घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तेथील बेरोजगारीचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

Shiv Sena MPs: उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांच्या विलयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; पण नोटीस जारी, पुढील सुनावणी कधी?

Live Updates Marathi: मागच्या १० वर्षांत १५२ वेळा पेपर लीक झाले- राहुल गांधी

Ajit Pawar Jayanti: स्वर्गीय अजित पवार जयंतीनिमित्त भीमाशंकर साखर कारखान्यात १० एकरांवर आंबा लागवड; एआय तंत्रज्ञानावर ऊसशेती मेळाव्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT