Attack On Donald Trump Esakal
ग्लोबल

Attack On Donald Trump: "पहिली गोळी ते...." ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराची घटना जशीच्या तशी; प्रत्यक्षदर्शीने सांगितले काय काय घडले

Trump Assassination Attempt: ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीत उपस्थित राहिलेल्यांपैकी एका महिलेने सांगितले की, ती समोरच्या रांगेत बसली होती. जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा ती थेट माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर होती.

आशुतोष मसगौंडे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack On Donald Trump) पेनसिल्व्हेनियामध्ये त्यांच्या रॅलीदरम्यान, शूटरने गोळीबार केला आहे. ज्यामध्ये एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली असून, त्यानंतर यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवले आणि रुग्णालायात दाखल केले आहे.

दरम्यान या रॅलीत उपस्थित असलेल्या एक व्यक्तीसोबत बंदूकधारी हल्लेखोरही मारला गेला आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबारावर खेद आणि चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही, असे ते म्हणाले.

8 राऊंड गोळीबार, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीने ट्रम्प आणि हल्लेखोर यांच्यावर गोळीबाराची संपूर्ण घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्याने पोलिसांत जबाब नोंदवला आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीचे नाव ग्रेग असून, हा हल्ला इमारतीच्या गच्चीवरून करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्याने हल्लेखोराला इमारतीच्या छतावरून उडी मारताना पाहिले. त्याच्या हातात रायफल होती.

ग्रेगच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर त्याच्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर होता, त्यामुळे त्या व्यक्तीच्या हातात बंदूक असल्याचे समोर आले, पण तो काही करण्याआधीच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ग्रेग यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्यावर जवळपास 8 गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र एकच गोळी ट्रम्प यांना लागली आणि तीही त्यांच्या कानाला लागून गेली. यावरून हल्लेखोर हा व्यावसायिक शूटर नव्हता असा अंदाज लावता येतो.

"आम्हाला फक्त त्याचीच काळजी होती"

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीत शनिवारी उपस्थित राहिलेल्यांपैकी एका महिलेने सांगितले की, ती समोरच्या रांगेत बसली होती. जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा ती थेट माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर होती.

या महिलेचे नवा एरिन, असून त्यांनी आडनाव सांगण्यास नकार दिला. त्या या घटनेबद्दल बोलताना म्हणाल्या, "रॅली सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला आणि सीक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांची स्टेजवर धावपळ सुरू झाली. इतक्यात मला ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यावेळी मला माझी काळजी नव्हती, आम्हाला फक्त त्याचीच (ट्रम्प) काळजी होती."

...वाटले की हा आवाज फटाक्यांचा आहे

रॅलीला उपस्थित असलेले डॉक्टर जोसेफ यांनी प्रत्यक्ष पाहिलं की, गोळीबारानंतर रॅलीच्या ठिकाणी गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

डॉ. जोसेफ म्हणाले की, "ते व्यासपीठाच्या अगदी डावीकडे ब्लीचर्समध्ये बसले होते. तेव्हा त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला आणि धक्का बसला. सुरुवातीला आम्हाला वाटले की हा आवाज फटाक्यांचा आहे. पण तो बंदुकीच्या गोळ्यांचा आहे हे लक्षात येताच तेथे मोठा गोंधळ उडाला."

डॉ. जोसेफ यांनी पुढे सांगितले की, "ट्रम्प यांच्याकडे तोंड करून बसलेल्या एका व्यक्तीला हल्लेखोराची गोळी लागली आणि तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी घटनास्थळी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT