TRUMP_JINPING 
ग्लोबल

धक्कादायक खुलासा; निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी चीनकडे मागितली मदत

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या पुस्तकातून छपाईपूर्वीच एक धक्कादायक माहिती समोर आली असून, बोल्टन यांनी अमेरिकेत २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ट्रम्प यांनी चीनकडे मदत मागितल्याचाही धक्कादायक खुलासा केला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नल, द वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये बोल्टन यांच्या पुस्तकातील काही भाग प्रकाशित करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये जपानच्या ओसोका येथे जी -२० शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. तसंच चीनची आर्थिक क्षमता कशाप्रकारे अमेरिकेतील निवडणूक प्रचारावर प्रभाव टाकू शकते, यावर त्याच्यात चर्चा झाली. तसंच जिनपिंग यांच्याकडे ट्रम्प यांनी निवडणूक जिंकवण्याचं आवाहनही केल्याचा दावा बोल्टन यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. अशातच करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला होता. तसंच करोना व्हायरसला चीन व्हायरस असंही म्हटलं होतं. परंतु, बोल्टन यांनी केलेल्या दाव्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेतील शेतकर्‍यांचे महत्त्वावर चर्चेदरम्यान जोर दिला आणि चीनने सोयाबीन आणि गहू खरेदी केल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो, यावरही भाष्य केलं. ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापार युद्ध संपविण्याची आणि पश्चिम चीनमधील उइगर मुस्लिमांसाठी शिबिर सुरू करण्याची ऑफर दिली होती, असा दावा बोल्टन यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT