ग्लोबल

नेमकं काय आहे त्या न फाटणाऱ्या फोटोमागचं 'रहस्य'

वृत्तसंस्था

शांघाय- दोन दिवसापूर्वी क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड ताकदीच्या कॅमेराने चीनमधील शांघाय शहराचा फोटो घेतल्याचा फोटो व्हायरल झाला. परंतु, आता त्या फोटोमागील रहस्य आणि सत्य समोर आले आहे. हा फोटो कुठल्या सॅटेलाईटमधून घेतला नसून जिंगकून टेक्नोलॉजी नावाच्या एका कंपनीने चिनमधील शांघाय शहराच्या ओरिएंटल पर्ल नावाच्या टॉवरवरून घेतला आहे.

यावेळी बऱ्याच मराठी आणि इंग्रजी वृत्तसंस्थानी नवीन "क्वांटम टेक्नोलॉजी"च्या सहाय्याने ही प्रतिमा घेतली असल्याचे म्हटले होते. म्हणजेच ही प्रतिमा चिनी उपग्रहाच्या सहाय्याने घेतली असल्याचे सांगण्यात आले होते.

जिंगकून टेक्नोलॉजी या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे चित्र 195 बिलीयन मेगापिक्सेल एवढ्या ताकदीने काढले आले असल्याचे सांगण्यात आले आहे. शांघायची सुंदरता या फोटोमधून दिसत आहे. हा आशियातील सर्वात मोठा फोटो असल्याचेही सांगण्यात येत आहे. जिंगकून टेक्नोलॉजी एक जागतिक दर्जाची नाविन्यपूर्ण एंटरप्राइज आहे जे क्रिएटिव्ह फोटोग्राफी आणि क्लाउड डेटा प्रोसेसिंगवर काम करते. हा फोटो शांघाय शहराचा असून फोटो असून 360 डिग्री पॅनोरामिक रिझोल्यूशनला हा काढण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Mango Rate : 1 डझन आंबा तब्बल 2500 रुपयांना! कोल्हापूरच्या बाजारात तमिळनाडूतून 'हापूस'च्या 40 पेट्या दाखल, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

रेल्वेच्या गोंधळात तिघांचा मृत्यू, एकाने एसी लोकलच्या धडकेत गमावला जीव; तर घाटकोपर-विक्रोळीदरम्यान दोन मृतदेह

महाराष्ट्रात साडेचार वर्षांत १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या; दररोज आठ जणांनी संपवले जीवन

Pune Graduate Election Result : पुणे पदवीधरसाठी मतमोजणीला सुरूवात, पहिल्या टप्प्यातील कौल दुपारनंतर येणार समोर; कोण मारणार बाजी?

Satara Drought: सातारा जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! धरणांत ८७.७८ टक्के साठा; तातडीने नियोजनाची गरज, टॅंकरची संख्याही वाढणार

SCROLL FOR NEXT