ग्लोबल

अमेरिकेत त्सुनामीचा इशारा; अलास्कामध्ये ८.२ रिश्टर स्केलचा भूकंप

विनायक होगाडे

नवी दिल्ली : अमेरिकेमधील अलास्का पेनिनसुलामध्ये बुधवारी रात्री भुकंपाचे जबरदस्त झटके पहायला मिळाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ८.२ रिश्टर स्केल सांगितली आहे. हे धक्के इतके तीव्र होते की, त्यानंतर त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची शंका वर्तवली गेली आहे. सध्या तरी या भूकंपात कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीची नोंद झाली नाहीये. मात्र, या भूकंपानंतर किनाऱ्याच्या भागात त्सुनामी लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमेरिकेच्या झिओलॉजिकल सर्व्हेने रात्री ११:१५ वाजता भूपृष्ठाच्या खाली ३५ किमी खाली भूकंपाचे केंद्र असल्याचं म्हटलंय. मात्र, या भूकंपाचा परिणाम खूप लांबवर झाला आहे. USGS च्या सांगण्यानुसार, त्यानंतर कमीतकमी आणखी दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.२ आणि ५.६ असल्याचं सांगितलं गेलंय. भूकंपांच्या या धक्क्यानंतर दक्षिण अलास्का, अलास्कामधील पेनिनसुला आणि एलेउटियन टापूवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP मध्ये बंडखोरीचा भडका! पक्ष आणि अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर; ७ खासदारांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप

Mumbai: आजारपणाला कंटाळला; केईएम रुग्णालयातच युवकाने धक्कादायक निर्णय घेतला, घटनेनं मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live : 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया

Pali News : रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी; अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

"ऐ, पार्टनर, आज सेलिब्रेशन तो बनता है!" विनोद कांबळी शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला, सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी दिलं सरप्राईज Video

SCROLL FOR NEXT