ग्लोबल

Turkey earthquake : ७० वर्षीय नागरिक ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर

पीटीआय

इझमीर (तुर्कस्तान) - तुर्कस्तानातील भूकंपामुळे पडझड झालेल्या इमारतीचे ढिगारे उपसण्याचे काम तिसऱ्या दिवशी सुरू होते. दरम्यान, इझमीर परिसरात एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७० वर्षीय व्यक्तीला सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. भूकंपामुळे आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून ९४० जण जखमी झाले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इझमीर शहरात ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या ६० वर पोचली आहे. इझमीर येथे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रीसमध्ये भूकंपामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने रविवारी रात्री एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० वर्षीय अहमद सितिम नावाच्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले. यासंदर्भात आरोग्यमंत्री फहरेतिन कोका यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. आपण आशा सोडली नव्हती, अशी प्रतिक्रिया अहमद यांनी दिल्याचे कोका यांनी म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT