

Rishabh Pant Post
Sakal
IPL 2027 Rishabh Pant Trade: आयपीएल २०२६ स्पर्धा गेल्याच महिन्यात संपली. या स्पर्धेनंतर महिनाभरातच मोठा ट्रेड झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन संघांनी हाय-प्रोफाईल ट्रेड केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादवला (Kuldeep Yadav), तर लखनौ सुपर जायंट्सने रिषभ पंतला (Rishabh Pant) एकमेकांकडे ट्रेड केले आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हता. अशात ही ट्रेड मोठी मानली जात आहे. लखनौ संघ आयपीएल २०२६ मध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर राहिल्यानंतर रिषभने नेतृत्वाताही राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच त्याचे दिल्ली संघात ट्रेड झाले आहे. ही रिषभ पंतची घरवापसीही मानली जात आहे