Turkey-Syria Earthquake esakal
ग्लोबल

Turkey Earthquake : वाह रे पाकिस्तान…! म्हणूनचं जग यांना शिव्या घालतं; तुर्कीने पाठविलेली मदतच…

सकाळ डिजिटल टीम

Turkey Earthquake Update : तुर्की आणि सीरीया या देशांमध्ये 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 45 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.8 एवढी होती.

या कठीण काळात जगातील अनेक देश तुर्कस्तान आणि सीरियाला मदतीचा हात पुढे करत आहेत, अशा वेळी पाकिस्ताननेही तुर्कस्तानला मदत पाठवली आहे, मात्र मदतीच्या नावाखाली पाकिस्तानकडून एक लाजिरवाणी कृत्य करण्यात आले आहे.

सध्या परकीय कर्ज आणि निधीच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या पाकिस्तानने भूकंपग्रस्त तुर्कस्तानला मदत साहित्य पाठवले होते, मात्र आता त्या मदत सामग्रीबाबतचा खुलासा झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा शरमेने मान खाली घालावी लागली आहे.

भूकंपानंतर पाकीस्तानने तुर्की आणि सीरीयाला मदत पाठवली आहे. यामध्ये 21 कंटेनर पाठवण्यात आले असून त्यात हिवाळ्यातील तंबू, ब्लँकेट आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. हे मदत साहित्य उघडून पाहीले असता, हे साहित्य तुर्कीनेच पाकिस्तानात पाठवलेले साहित्य असल्याचे दिसून आले. यापूर्वी पाकिस्तानात आलेल्या पुरानंतर तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत सामग्री पाठवली होती. पाकीस्तानने तिच सामग्री पुन्हा पॅक करून तुर्कीला पाठवली आहे.

पाकीस्तानच्या एका वरीष्ठ पत्रकाराने याबद्दल खुलास केला आहे. शाहिर मंजूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. इस्लामाबादहून अंकाराला पाठवलेली मदत सामग्री गेल्या वर्षीच्या पुरानंतर तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठवलेल्या मदतीसारखीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टीव्हीवरील चर्चेदरम्यान ते म्हणाले, मदत सामग्रीवर पाकिस्तान सरकारचा टॅग लावलेला आहे, मात्र तेथील लोकांनी तो उघडला तेव्हा त्यावर 'तुर्कीकडून प्रेमने...' असा आशय लिहिलेला होता.

तुर्कस्तानने नकार देऊनही पाकिस्तानचे पंतप्रधान दोन दिवसांपूर्वी अंकाराला पोहोचले होते, जिथे त्यांनी तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप आल्यानंतर लगेच शहबाज शरीफ यांनी या देशांच्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानंतर तुर्कीच्या बाजूने असे सांगण्यात आले की त्यांचे प्रशासन देशाला भूकंपातून बाहेर काढण्यात व्यस्त आहे. अशा स्थितीत ते इतर कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांचे यजमानपद भूषवू शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT