Hamas Chief 
ग्लोबल

Haniyeh Assassination : हमासचा प्रमुख हानियाची भारतीय 'अमित नाकेश'ने केली हत्या? तुर्की मीडियाचा खळबळजनक दावा, पण...

Who Is Amit Nakesh : इस्राईलवर मागील वर्षी झालेल्या हल्ल्यानंतर ‘हिट लिस्ट’वर असलेला हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया याची इराणची राजधानी तेहरान येथे हत्या करण्यात आली

रोहित कणसे

इस्राईलवर मागील वर्षी झालेल्या हल्ल्यानंतर ‘हिट लिस्ट’वर असलेला हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया याची इराणची राजधानी तेहरान येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान हानिया याची हत्या भारतीय व्यक्ती 'अमित नाकेश' याने केली? यासंबंधीच्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. पण नेमकं ही चर्चा हा होऊ लागली? नेमकं हे प्रकरण काय आहे? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तुर्की मीडिया आउटलेट्सच्या रिपोर्ट्समध्ये दाव केला गेला की हामासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येसाठी 'अमित नाकेश' नावाच्या एका एजंटला पाठवण्यात आले होते. मात्र या मीडिया आउटलेट्सना त्यांचा दावा मागे घ्यावा लागला आहे.

उसाक ओले सारख्या तुर्की न्यूज आऊटलेट्सनीतर अमित नाकेश याची संपूर्ण प्रोफाइल देखील लिहून टाकली होती. ज्यामध्ये आरोपी भारतीय वंशाचा इस्त्राईली नागरीक असू शकतो असे सांगण्यात आले होते. याचे कारण म्हणजे आरोपीचे नाव अमित जे भारतात अनेकांचे नाव आहे. मात्र तुर्की मीडिया आऊटलेट्सना थोड्याच वेळात त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच अमित नाकेशचा उल्लेख काढून टाकला.

नेमकं काय झालं?

तुर्की मीडियामध्ये ज्या अमित नाकेशचा उल्लेख करण्यात आला होता त्याबद्दल टाइम्स ऑफ इस्त्राईलमध्ये आणि जेरुसलम पोस्ट सारख्या माध्यमांमध्ये खुलासा करण्यात आलाय अमित नाखेस हिब्रु शब्द हमित्नाकेश सारखा ऐकू येतो, ज्याचा अर्थ हत्यारा असा देखील आहे.

दरम्यान तुर्की मीडियाकडून झालेल्या या चुकीनंतर सोशल मीडियावर याची खिल्ली उडवली जात आहे. इस्त्राईलमध्ये तर काही लोकांनी अमित नाकेश नावाने प्रोफाइल देखील तयार केले आहेत.

तेहरानमध्ये इराणचे नवे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्‍कियान यांच्या शपथविधी सोहळ्यात हानिया सहभागी झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे हानिया याची हत्या करण्यात आली होती.

हनिया याच्या मृत्युनंतर हमासने एक निवेदन प्रसिद्ध करत सूड घेण्याचा निश्‍चय व्यक्त केला होता.

कोण होता इस्माईल हनिया?

इस्राईलवर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिन्वर हा होता. सिन्वर हा हमासचा सर्वोच्च म्होरक्या आहे. मात्र, हनिया हा हमासचा मवाळ चेहरा मानला जात होता. इस्राईलकडून हल्ल्याच्या भीतीने २०१९ मध्येच गाझा पट्टीतून बाहेर पडत कतारमध्ये विजनवासात तो राहात होता. एप्रिलमध्ये इस्राईलने गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हनियाची तीन मुले आणि चार नातवंडे मारली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT