Zeng Guang
Zeng Guang Sakal
ग्लोबल

विषाणू उगमाचा तपास अमेरिकेकडे वळवा; चीनचे झेंग गुआंग यांचा उलटवार

सकाळ वृत्तसेवा

शांघाय - कोरोनास (Corona) कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे (Virus) काही रुग्ण पहिल्या अधिकृत केसच्या काही आठवडे आधीच अमेरिकेत (America) मिळाल्याच्या अहवालावरून (Report) चीनने (Chin) उलटवार करण्याची संधी साधली. विषाणू तपासाच्या पुढील टप्प्यात अमेरिकेवरच लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे चीनचे मुख्य साथरोगतज्ज्ञ झेंग गुआंग (Zeng Guang) यांनी म्हटले आहे. (Turn US to Investigate the Origin Coronavirus Zeng Guang)

विषाणू उगमावरून अमेरिका आणि चीन यांच्यात राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकी राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) नुकताच एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार अमेरिकेतील पाच वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किमान सात रुग्णांना SARS-CoV-२ विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते.

या पार्श्वभूमीवर चीनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे मुख्य साथरोगतज्ज्ञ असलेले गुआंग यांनी सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्सला मुलाखत दिली. ते म्हणाले की, आता अमेरिकेकडे लक्ष वळवायला हवे. साथीच्या प्रारंभीच्या काळात लोकांच्या चाचण्या करण्याबाबत त्यांचे धोरण संथ होते. तेथे अनेक जैविक प्रयोगशाळा आहेत.

गुआंग यांनी अतिशयोक्ती वाटेल असेही विधान केले. अमेरिकेकडील जैवअस्त्रांशी संबंधित सर्व वस्तूंची तपासणी व्हायला हवी, असे ते म्हणाले.

२०१९च्या अखेरीस वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावरून तेथील विषाणूशास्त्र संस्था चर्चा अन्् वादाच्या केंद्रस्थानी आली. जून महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेतील एका राष्ट्रीय प्रयोगशाळेने वुहानच्या प्रयोगशाळेतून विषाणूची गळती झाली असावी असा निष्कर्ष काढला होता. तसे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले होते.

त्याआधी आणखी एका अभ्यास अहवालानुसार युरोपमध्ये त्याआधी म्हणजे सप्टेंबरमध्येच या विषाणूचा फैलाव होत असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली. हे अहवाल तयार करणाऱ्या संशोधकांनी चीनकडे केले बोट मात्र मागे घेतलेले नाही. विषाणू आधी इतरत्र होता म्हणजे त्याचा उगम चीनमध्ये झाला नाही असे म्हणता येणार नाही, असेही संशोधकांनी आवर्जून नमूद केले आहे. चीनमध्ये अनेक प्राण्यांस SARS सारखे विषाणू आढळले आहेत.

परराष्ट्र प्रवक्ते तर म्हणतात...

चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी सुद्धा अमेरिकेची कोंडी करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले की, कोविड-१९च्या प्रसाराची अनेक उगमस्थाने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्लूएचओ) याबाबत इतर देशांनी सहकार्य केले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT