Twitter 
ग्लोबल

फेसबुकनंतर ट्विटरनेही जाहीर केली तालिबानसंदर्भात आपली भुमिका; म्हणाले...

विनायक होगाडे

नवी दिल्ली : तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान देशाचा ताबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुकने तालिबानच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. फेसबुकने म्हटलंय की, अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. आणि आम्ही आमच्या Dangerous Organisation Policies अंतर्गत त्यांच्यावर बंदी घातली आहे. दुसरीकडे ट्विटरनेही आपली भुमिका जाहिर केली आहे.

ट्विटरच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती गतीने बदलत आहे. तिथले लोक मदतीसाठी ट्विटरचा वापर करत आहे, हे आम्हाला आढळून आलंय. लोकांना सुरक्षित राखणं, हे ट्विटरचं पहिलं प्राधान्य असेल, त्यासाठी आम्ही नेहमी दक्ष असू, असं ट्विटरच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आम्ही ट्विटरचे नियम सक्रियपणे राबवण्यावर भर देत आहोत आणि आमच्या धोरणांचं उल्लंघन करणाऱ्या कंटेटबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. विशेषत: हिंसेचं उदात्तीकरणाबाबत आम्ही पुनरावलोकन करु.

फेसबुकने केली बंदीची कारवाई

फेसबुकने तालिबानच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. फेसबुकने म्हटलंय की, अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. आणि आम्ही आमच्या Dangerous Organisation Policies अंतर्गत त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे तालिबानसाठी फेसबुकच्या सर्व सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तालिबानसंदर्भातील सगळे अकाउंट डिलीट केले जातील. तसेच तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या सर्व अकाउंट्सवर बंदी घातली जाईल. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, कंपनीकडे दरी आणि पश्तो भाषेतील तज्ज्ञ लोकांची संपूर्ण टीम आहे जी स्थानिक कंटेटवर लक्ष ठेवून आहे तसेच आम्हाला त्यासंदर्भात माहिती देत आहे. फेसबुकने म्हटलंय की, गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानचे अनेक नेते आणि प्रवक्ते फेसबुकवर आहेत, ज्यांच्या फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपवरुन देखील तालिबानला बॅन करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT