Elon Musk Jack Dorsey
Elon Musk Jack Dorsey esakal
ग्लोबल

Elon Musk नं जॅक डोर्सीची घेतली मदत; ट्विटर डील उल्लंघनात साक्ष देण्यासाठी बजावला 'समन्स'

सकाळ डिजिटल टीम

मस्कनं आता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मदत घेतलीय.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) विकत घेण्याच्या करारातून माघार घेतल्यानंतर, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Tesla CEO Elon Musk) कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. कराराचं एकतर्फी उल्लंघन केल्याबद्दल ट्विटरनं अमेरिकेतील डेलावेअर न्यायालयात (Delaware Court) त्याच्याविरुद्ध दावा दाखल केलाय.

यासाठी मस्कनं आता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Former Twitter CEO Jack Dorsey) यांची मदत घेतलीय. डोर्सी यांना न्यायालयानं समन्स बजावून साक्ष देण्यासाठी बोलावलंय. कोर्टाच्या दस्तऐवजानुसार आणि त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ साक्ष देण्यासाठी मस्क यांना डोर्सीनं ट्विटर विकत घेण्यासाठी $44 अब्जच्या करारातून मदत करावी, अशी इच्छा आहे.

ट्विटर-मस्क प्रकरणी डेलावेअर न्यायालय 17 ऑक्टोबरला पुढील सुनावणी करणार आहे. डोर्सी यांना या दिवशी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय. ट्विटर आणि मस्क यांच्यातील वाद म्हणजे, टेस्लाच्या सीईओला ही सोशल मीडिया साइट विकत घेण्यास भाग पाडलं जाऊ शकतं का? जर मस्कनं एकतर्फी आणि मनमानीपणे करार मोडला, तर त्याला ट्विटरला नुकसान भरपाई द्यावी लागेल. मस्कनं हा करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेनंतर ट्विटरनं त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केलाय.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘टेस्लाचे’ मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरला मोठा झटका दिला. मस्क यांनी ट्विटरसोबतची डील रद्द केलीय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर विकत घेत असल्याची घोषणा केली होती. ही डील 44 बिलियन डॉलरमध्ये ठरली होती. मात्र, आता आपण ही डील रद्द करत असल्याची घोषणा मस्क यांनी केली. त्यामुळं मस्क यांच्याविरोधात ट्विटरनं दावा दाखल केलाय. कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

Marathi News Live Update: कंगणा रणौत आज मंडीमधून भरणार उमेदवारी अर्ज

T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित अन् आगरकरला हार्दिक पांड्या संघात नको होता; मग तरी कशी झाली निवड?

VIDEO: 'गजगामिनी चाल' म्हणजे काय? अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल

Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्थ भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

SCROLL FOR NEXT