elon musk
elon musk sakal
ग्लोबल

Twitter Deal Ends: अखेर ट्वीटरची Elon Musk विरोधात कारवाई; केले गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

एलॉन मस्क यांनी शनिवारी ट्वीटरसोबतची ४४ बिलियन डॉलर्सचा करार रद्द करत ट्वीटरला मोठा झटका दिला.यावर संतापलेल्या ट्विटरने एलॉन मस्क विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. यावर मंगळवारी अखेर ट्वीटरने मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत खटला दाखल केलाय. (twitter sued elon musk for violating the deal)

आम्हाला हा करार पूर्ण करायचा आहे. हा करार करताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यानुसार ठरलेली किंमत देऊन एलन मस्क यांना हा करार पूर्ण करावा अशी मागणी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट लेअर यांनी केली आहे.यासाठी आम्हाला न्यायालयात जावे लागले तरी चालेल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या आधीच मांडली होती. (Twitter Deal Ends)

१४ एप्रिल रोजी एल़ॉन मस्क यांनी ट्वीटरसोबत करार करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ट्वीट आणि मस्क यांच्यात अनेक कारणांवरुन वाद सुरू होते.अखेर याला पुर्णविराम लावत मस्क यांनी ट्वीटरयांच्यासोबतचा करार रद्द केल्याची घोषणा केली.

हा करार रद्द करण्यामागे अनेक कारणे बोलली जात आहे.त्यातील एक महत्त्वाच कारण म्हणजे ट्वीटने एलॉन यांना फेक अकाउंटची सांगितलेली आकडेवारी चुकीची होती.तर ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट लेअर म्हणतात की करारादरम्यान झालेल्या अटी आणि नियमांचे मस्क यांनी पालन करावे.

काय होता करार?

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी ४४ बिलिअन डॉलरचा करार केला होता. यासाठी इलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये ५४.२० डॉलर प्रति शेअरचा करार झाला होता. मात्र, मे महिन्यात इलॉन मस्क यांनी हा करार थांबवला.

ट्विटरमधील फेक खाती पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच हा करार करण्यात येईल, असं इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं. पहिल्या तिमाहित दैनिक सक्रीय यूजर्समधील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती ट्विटरने दिली होती. मात्र ही माहिती खोटी असल्याचे एलॉन मस्कचे म्हणणे आहे.

ट्वीटरचे शेअर्स घसरले

एलॉन मस्क यांनी करार रद्द केल्यानंतर ट्वीटच्या शेअर्सवर याचा जोरदार फटका बसलाय. ट्विटर शेअर्स 11.3% नी घसरले. सध्या ट्वीटरच्या 1 शेअरची किंमत US$ 33.31 आहे, जी मस्कच्या US $ 54.20 प्रति शेअरच्या ऑफरपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे येत्या दिवसात ट्वीटला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT