Twitter
Twitter 
ग्लोबल

ट्विटरचा थेट अमेरिकेच्या अध्यक्षांनाच इशारा  

यूएनआय

वॉशिंग्टन - सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका दिवसेंदिवस कोरोनाच्या विळख्यात अडकतच चालल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच आता सोशल माध्यमावरील ट्विटर ने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. ट्विटर ने डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या काही ट्विटवर फॅक्ट चेकचा संदेश देत चेतावणी दिली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच ट्विटर या सोशल माध्यमाचा वापर करत आपल्या खात्यावरून ट्विट करत असतात. यावेळी ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या काही ट्विटस वर फ्लॅग करत फॅक्ट चेकचा इशारा दिला आहे. ट्विटरच्या या संदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा हा संदेश बोलण्याच्या स्वातंत्र्याविरुद्ध असल्याचे म्हणत, शिवाय ट्विटरचे हे कृत्य म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'मेल-इन-बॅलेट्सला बनावट' आणि 'मेल बॉक्स लुटला जाईल' असा संदेश आपल्या ट्वीट मध्ये लिहीत अधीकृत खात्यावरून शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या या ट्वीट्स वर लिंक येत असून, मेल-इन-बॅलेट्सविषयी तथ्य जाणून घ्या असा लिहिलेला मजकूर येत आहे. या लिंक वरून ट्विटरच्या फॅक्ट चेक्स पेज वर जाता येते. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबधीत त्यांनी केलेल्या खोट्या दाव्यांबाबत माहिती दिसते.

ट्विटरच्या या संदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर टीका केली असून, ट्विटरचे हे कृत्य म्हणजे २०२० च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे सांगितले आहे. तसेच आपल्या विधानामुळे भ्रष्टाचार आणि फसवणूक वाढण्याचा धोका असल्याचे ट्विटरचे म्हणणे असून, हे चुकीचे असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे. शिवाय हा निष्कर्ष सीएनएन आणि अ‍ॅमेझॉन वॉशिंग्टन पोस्टच्या तथ्य-तपासणीच्या आधारावर असल्याचे म्हणत, आपल्या पुढच्या ट्विट मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा हा संदेश बोलण्याच्या स्वातंत्र्याविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. आणि ट्रम्प यांनी पुढे लिहीत आपण राष्ट्रपती म्हणून असे अजिबात होऊ देणार नसल्याचे अधोरेखित केले आहे.

दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या काळात डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळताना दिसले होते. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर माध्यमांनी बरीच आलोचना करत टीका केली होती. मात्र माध्यमांची ही वागणूक म्हणजे आपण कोणतेतरी पाप केले असल्याचे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांवर निशाणा साधला होता. सध्य स्थितीत अमेरिकेत सर्वात जास्त १६ लाख ८१ हजार ४१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ९८ हजार ९२९ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT