Astronaut 
ग्लोबल

दोन अंतराळवीरांची क्वारंटाइन प्रक्रिया सुरू

यूएनआय

न्यूयॉर्क - नासाच्या दोन अंतराळवीरांनी आगामी मोहिमेची तयारी म्हणून दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन प्रक्रिया सुरू केली आहे. २७ मे रोजी फाल्कन ९ रॉकेट वाहून नेणाऱ्या स्पेस एक्स क्रू ड्रॅगन अंतराळयानात त्यांना ठेवले जाईल.

रॉबर्ट बेहनकेन व डग्लस हर्ली अशी अंतराळवीरांची नावे आहेत. नासाच्या स्पेस एक्स डेमो-२ मोहिमेसाठी ते आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जातील. सध्या कोरोनामुळे जगभर अनेक लोक वेगवेगळ्या कालावधीसाठी क्वारंटाइन होत आहेत. संसर्ग टाळण्याचा त्यांचा उद्देश आहे. अंतराळवीरांसाठी मात्र ही प्रक्रिया नेहमीचीच असते.

दृष्टिक्षेपात

  • प्रत्येक मोहिमेसाठी अंतराळयानात बसण्यापूर्वी क्वारंटाइन आवश्यक
  • प्रकृती स्थिर राहण्याचा उद्देश
  • अपोलो मोहिमेपासूनच ही सुरूवात
  • शटल तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या मोहिमांसाठीही हा निकष
  • २०११ मध्ये स्पेस शटल उपक्रम पार पडल्यानंतर अमेरिकेच्या भूमीतून सोडण्यात आलेल्या अमेरिकन अंतराळयानावरील केंद्रात उड्डाण करणारे नासाचे हे पहिलेच अंतराळवीर
  • नासाच्या व्यावसायिक क्रू मोहिमेचा स्पेस एक्स एक भाग
  • स्पेस एक्सच्या क्रू वाहतुक पद्धतीची चाचणी करण्यासाठी डेमो-२ फ्लाईट
  • ६३व्या मोहिमेसाठी यापूर्वीच अवकाशातील प्रयोगशाळेत असलेल्या ख्रिस कॅसीडी, अनातोली इव्हानीशीन  व इव्हान वॅग्नर यांना भेटणार
  • क्वारंटाइनमुळे सहकाऱ्यांच्या व स्वतःच्या प्रकृतीला असलेला संभाव्य धोका टाळण्याचा उद्देश
  • कोरोनामुळे क्वारंटाइनची अतिरीक्त खबरदारी
  • अंतराळवीर असलेल्या ठिकाणी येणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची नियमित तपासणी
  • अशा व्यक्तींचा ताप मोजला जाणार तसेच लक्षणांची तपासणी होणार
  • दोन अंतराळवीरांसह संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी दोन वेळा होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT