Coronavirus 
ग्लोबल

सोशल डिस्टन्सिंगसाठी दोन मीटरचे अंतर अपुरेच

यूएनआय

न्यूयॉर्क - संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार विषाणूबाधेपासून वाचण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून केवळ दोन मीटरचे अंतर पुरेसे नाही. ताशी चार किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोरोना विषाणू सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्‍सच्या वतीने ‘फिजिक्‍स ऑफ फ्लुईड्‌स’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे, की हवेची गती शून्य असताना माणसाच्या खोकल्यातून निघालेले तुषार दोन मीटरही लांब जाऊ शकत नाहीत; परंतु वाऱ्याचा वेग ताशी चार ते १५ किलोमीटर असल्यास हे तुषार सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

वाऱ्याचा वेग ताशी १५ किलोमीटर असल्यास खोकल्यातील थुंकीचे तुषार १.६ सेकंदांत सहा मीटर दूर जाऊ शकतात. त्यामुळे विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दोन मीटरचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही. गर्दीच्या ठिकाणी याचा मोठा परिणाम होऊ शकतो. वाऱ्याचा वेग अधिक असताना घराबाहेर पडणे टाळायला हवे, असे यात नमूद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT