ग्लोबल

फायझरच्या लशीचा आरोग्यसेवकांवर दुष्परिणाम

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - फायझर कंपनीची कोरोनावरील लस टोचल्यानंतर अमेरिकेतील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर काही मिनिटांतच दुष्परिणाम दिसून आला. हे दोन्‍ही कर्मचारी अलास्कात एकाच रुग्णालयात काम करीत आहेत. यातील एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या घटनेचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा खुलासा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला असून सर्व प्रक्रिया पारर्दशी असावी, या हेतूने ही माहिती जाहीर करीत असल्याचे सांगितले. लशीचा दुष्परिणाम झालेली एक मध्यम वयीन महिला आरोग्य कर्मचारी असून तिला कोणत्याही औषधाची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची ॲलर्जी नाही. जूनेयू येथील बार्टलेट प्रादेशिक रुग्णालयात मंगळवारी (ता. १५) तिला लस देण्यात आली. त्यानंतर दहाच मिनिटांनी तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर पुरळ उठले. तिला धाप लागू लागली आणि हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली.  तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. ती आता बरी असून निरीक्षणाखाली ठेवल्याची माहिती रुग्णालयाच्या आप्तकालीन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लिंडी जोन्स यांनी दिली. दुसऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला बुधवारी (ता.१६) लस दिल्यानंतर दहा मिनिटांनी डोळे सुजणे, डोकेदुखी आणि घशात खवखव अशी लक्षणे आढळली, अशी माहिती रुग्णालयाने निवेदनाद्वारे दिली. ही लक्षणे अतितीव्र नसल्याने उपचारानंतर एका तासात तो बरा झाल्याचे सांगण्यात आले. ब्रिटनमध्ये लसीकरणादरम्यान दोन आरोग्य कर्मचारी डोस घेतल्यानंतर आजारी पडले होते. यानंतर ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी लस घेऊ नये, असा इशारा  देण्यात आला होता.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अलास्कातील घटनांमुळे फायझरने लसीकरण थांबविण्याची अजिबात आवश्‍यकता नसून, लशीतील कोणत्या घटकांमुळे परिणाम होत आहे, याचा अभ्यास संशोधकांनी करावा. 
- डॉ. पॉल ए. ऑफिट, लसतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT