ग्लोबल

चीनला ‘इन-फा’ वादळाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

शांघाय : चीनच्या पूर्व किनाऱ्याला ‘इन-फा’ या चक्रीवादळाने धडक दिली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळाने झेनजिआंग प्रांतातील झौशन गावाला सर्वप्रथम धडकले. या वादळामुळे पूर्व किनाऱ्यावर ३५० मिमी पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळातील वाऱ्यांचा वेग १५५ किलोमीटर प्रतितास इतका आहे. या वादळाने तैवानलाही तडाखा दिला आहे. वादळाचा जोर असल्याने शांघाय येथील दोन्ही विमानतळांवरून होणारी शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली असून उद्याही हे विमानतळ बंदच राहण्याची शक्यता आहे.

शांघायच्या जवळच असलेल्या निन्गबो शहरातही पावसाचा जोर असून सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चीनच्या मध्य प्रांतात पूरपरिस्थिती कायम असताना हे दुसरे नैसर्गिक संकट चीनवर येऊन धडकले आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात वित्त हानी झाली असली तरी अद्यापपर्यंत कोणीही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

FDA Action: काजू कतलीत अळ्या अन् गोदामात झुरळे; एफडीएची Reliance Retail, Blinkit आणि Amazonवर कडक कारवाई!

गोविंदाने नर्मदा नदीत उतरत जीव देण्याचा केलेला प्रयत्न, म्हणाला, “सगळं संपलं होतं आणि…”

Marathi News Live Updates : ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाला वेठीस धरले’; खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT