UAE emirates
UAE emirates 
ग्लोबल

भारतासह पाच देशांच्या नागरिकांना UAEत परतण्यास परवानगी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारत-नेपाळसह सहा देशांचे नागरिक ज्यांच्याकडे UAEत वास्तव्याचा अधिकृत परवाने आहेत, त्या नागरिकांना आता युएईत परतता येणार आहे. कारण त्याच्यावरील कोरोना निर्बंधांमुळे घातलेली बंदी UAEतील प्रशासनाकडून उठवण्यात आली आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपासून या देशांतील नागरिकांना UAEत परतता येणार आहे. पण यासाठी त्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे.

UAEच्या नॅशनल ईमर्जन्सी क्रायसिस अँड डिझास्टर मॅनेजमेंट ऑथरिटी (NCEMA) आणि जनरल सिव्हिल एव्हिएशन ऑथरिटीच्या निर्देशांनुसार नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, नायजेरिया आणि युगांडा या देशातील नागरिकांनाही UAEत जाण्याासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांच्या देशानं दिलेले लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर UAEनं काढलेल्या नव्या आदेशानुसार, लसीकरण पूर्ण झालेले आणि लसीकरण न झालेल्या अशा अनेक विभागातील रहिवाशांनाही येत्या ५ ऑगस्टपासून UAEत प्रवेश करता येणार आहे. यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि युएईतील टेक्निशिअन्स कर्मचारी यांचा समावेश आहे. तर जे शिक्षण विभागात काम करतात असे विद्यार्थी, मानवहितासंबंधीची प्रकरणांमधील प्रवाशी ज्यांच्याकडे अधिकृत रहिवासी परवाना आहे. तसेच फेडरलचे कर्मचारी आणि स्थानिक सरकारी कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

प्रवाशांना फेडरल अथॉरिटी फॉर आयडेंटिटी अँड सिटिझनशिपच्या वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लसीकरण प्रमाणपत्रांव्यतिरिक्त, अर्जदारांनी निर्गमन तारखेच्या 48 तासांच्या आत निगेटिव्ह पीसीआर चाचणीचा रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विमानात चढण्यापूर्वी त्यांची एक चाचणी केली जाईल आणि यूएईमध्ये आल्यानंतर पीसीआर चाचणी केली जाईल. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT