ashraf-ghani 
ग्लोबल

कुटुंबासह अश्रफ घनींना माणुसकीच्या नात्यानं आश्रय दिलाय - UAE

या निवेदनामुळं घनी युएईत असल्याचं आता स्पष्ट झालंय

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्ज्यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी कुटुंबियांसह देशातून पलायन केलं. घनी ताजिकिस्तानला पळून गेल्याचं सांगितलं जात होतं. पण आता ते युनाटेड अरब अमिरातीमध्ये (UAE) असल्याचं समोर आलं आहे. कारण UAE नं याबाबत स्पष्टीकरण देताना आम्ही माणुसकीच्या नात्यानं अश्रफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिल्याचं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.

UAEच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स आणि इंटरनॅशनल कोऑपरेशननं हे स्पष्ट केलं की, "आम्ही मानवतेच्या नात्यानं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाचं स्वागत केलं आहे." UAE च्या वॅम न्यूजन याबाबत वृत्त दिलं आहे. पण एका वाक्याच्या य़ा निवेदनात अश्रफ घनी नेमके कुठे आहेत? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर विजय मिळवल्यानंतर ७२ वर्षीय राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी आपल्या कुटुंबासह देशातून पलायन केलं होतं. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानच्या स्थितीबाबत बोलताना म्हटलं होतं की, "अश्रफ घनी यांचं प्रशासनच अफगाणमधील परिस्थितीला कारणीभूत आहे. अफगाणिस्तानातील राजकीय नेते या बिकट प्रसंगात एकत्र येऊन देशाच्या भविष्यासाठी वाटाघाटी करण्यात कमी पडले."

त्याचबरोबर रशियाच्या राजदुतांनीही आरोप केला की, "अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घनी हे काबूलमधून कार, हेलिकॉप्टर आणि सरकारी तिजोरीतील पैसा घेऊन फरार झाले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT