UK election results Labour Party emerges victorious Rishi Sunak loses elections to Keir Starmer  
ग्लोबल

UK Election Results : ब्रिटनमध्ये चौदा वर्षांनी सत्तांतर! हुजूर गेले, मजूर आले, सुनक यांचा पराभव

UK Election Results News : या विजयानंतर स्टार्मर (वय ६१) यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन राजे चार्ल्स (तृतीय) यांची भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : ब्रिटिश राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे आश्वासन देत सर्वांगीण बदलाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर पक्षाने (लेबर पार्टी) संसदीय निवडणुकीत सर्वोच्च नेते केईर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली आज ब्रिटनची सत्ता काबीज केली. येथे तब्बल चौदा वर्षांनी हा पक्ष सत्तेत आला असून मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) पराभवाचे तोंड पाहावे लागले. सुनक यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नेतेपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

या विजयानंतर स्टार्मर (वय ६१) यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन राजे चार्ल्स (तृतीय) यांची भेट घेतली. ते आता ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ची सूत्रे हाती घेतील. संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाने ६५० जागांपैकी ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त केला असून हा पक्ष बहुमताजवळ पोचला आहे. हुजूर पक्षाला मात्र १२१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. लंडनमध्ये केलेल्या विजयी भाषणात स्टार्मर यांनी बदलाला सुरूवात झाली असून आता मला खरोखरच आनंद होतो आहे असे नमूद केले. ‘‘ हे एवढे मोठे बहुमत एक मोठी जबाबदारी घेऊन येत असते. देशाला एकसंध ठेवणाऱ्या संकल्पनांचे पुनरुज्जीवन करायला हवे. हे राष्ट्रीय पुनरुज्जीवन आहे. तुम्ही कुणीही असा, कोठेही असा, नियमाने काम केल्यास हा देश प्रत्येकाला योग्य संधी देईल,’’ असे स्टार्मर यांनी सांगितले. ऋषी सुनक हे उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थॲलर्टन येथून २३ हजार ०५९ मतांनी विजयी झाले पण त्यांच्या पक्षाला मात्र पराभूत व्हावे लागले.

भारताला काय?


जम्मू- काश्मीरच्या मुद्यावरून मजूर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे या पक्षाचे भारतासोबतचे संबंध बिघडले होते. आता ते पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान स्टार्मर यांच्यासमोर असेल. मुक्त व्यापार कराराबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे पण त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. स्टार्मर यावर निर्णायक पावले टाकतील अशी अपेक्षा आहे.

पक्षीय बलाबल
६५०
एकूण जागा
........
३२६
बहुमतासाठी
.........
४१२ (+ २१४)
मजूर पक्ष
..........
१२१ (-२५१)
हुजूर पक्ष
........
७१ (+६३)
लिबरल डेमोक्रॅटिक
........
९ (-३७)
स्कॉटिश नॅशनल पार्टी
.......
७ (+०)
सिन फेईन (डावा कॅथलिक पक्ष)
......
२८ (+११)
अन्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द, १९४६ ला सुरू झालेल्या बँकेला RBIचा दणका

भारतीयांनो लगेच इराण सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

Latest Marathi News Live Update: तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीवरून नांदेडमध्ये आंदोलन

Gratuity Money: तुमचा हक्काचा पैसा! ग्रॅच्युइटी कशी मिळते? कॅल्क्युलेशन आणि Tax नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT