ग्लोबल

ब्रिटनची कोविशील्डला मंजुरी पण भारताच्या लसीकरण सर्टिफिकेटवर शंका

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोविशील्ड लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनने त्यांच्या देशात प्रवासाला परवानगी दिली आहे.

भारतात कोविशील्ड लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनने त्यांच्या देशात प्रवासाला परवानगी दिली आहे. ब्रिटनने सुरुवातीला कोविशील्डच्या लशीला मान्यता दिली नव्हती. त्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर ब्रिटनने माघार घेतली आहे. मात्र जरी कोविशील्डला परवानगी दिली असली तरी लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर प्रश्न उपस्थित करत ब्रिटनने नव्या गाइडलाइन जारी केल्या आहेत.

भारताच्या लसीकरण सर्टिफिकेटबाबत प्रश्न उपस्थित करताना ब्रिटनने म्हटलं की, दोन डोस घेतलेल्या भारतीयांना क्वारंटाइन रहावं लागेल. तसंच यादीत असलेल्या लसीच्या फॉर्म्युलेशनबाबत ब्रिटनने माहिती दिली असून एस्ट्राझेनका कोविशील्ड, एस्ट्राझेनका व्हॅक्सजेवरिया आणि मॉडर्ना टेकेडा या लशींना मान्यता असल्याचं म्हटलं आहे.

कोविशील्डचे डोस घेतलेल्या भारतीयांना क्वारंटाइनच्या प्रक्रियेतून जावं लागेल असं ब्रिटनने म्हटलं आहे. म्हणजेच ब्रिटनला सध्या कोविशील्ड लशीची अडचण नाही तर लसीकरणाच्या सर्टिफिकेटबाबत शंका आहे. ब्रिटनने म्हटलं की, लसीकरणाच्या सर्टिफिकेटचा आवाका वाढवण्याबाबत आम्ही भारतासोबत चर्चा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT