Nirav Modi 
ग्लोबल

प्रत्यार्पणाविरोधात अपिलासाठी नीरव मोदीला UK हायकोर्टाची परवानगी

नीरव मोदी पीएनबी घोटळ्यातील मुख्य आरोपी आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लंडन : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला युकेच्या हायकोर्टानं भारताकडे होणाऱ्या संभाव्य प्रत्यार्पणाविरोधात अपिल करण्यासाठी परवानगी दिली आहे. अपिल करताना नीरव मोदीनं आपली मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं कारण दिलं होतं.

गेल्या महिन्यात नीरव मोदीनं प्रत्यार्पणाविरोधात अपिल करताना कोर्टाला सांगितलं होतं की, भारतीय तुरुंगांची स्थिती वाईट असून तिथल्या तुरुंगात आपली रवानगी झाल्यास नैराश्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याची परिणीती आत्महत्येमध्ये देखील होऊ शकते.

मोदीच्या या अपिलावर युकेच्या हायकोर्टाचे न्या. मार्टिन चेंबरलिन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर २१ जुलै रोजी सुनावणी झाली होती. कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे ही सुनावणी पार पडली होती. त्यावेळी कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, आज (सोमवार) जिल्हा न्यायाधिश सॅम गुझी यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात अपिलासाठी हायकोर्टानं परवानगी दिली.

दरम्यान, नीरव मोदीच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवादादरम्यान सांगितलं होतं, भारतातील तुरुंगांमध्ये डॉक्टर्सची कमी असून ते क्षमतेपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या तुरुंगातील कैद्यांसाठी सेवा देतात. त्यामुळे तातडीची गरज भासल्यास कैद्याला क्लिनिकमध्ये नेण्यासही उशीर होतो. नीरव मोदीची मानसिक स्थिती ठिक नाही. नीरव मोदी आठ वर्षांचा असताना त्याच्या आईनं आत्महत्या केली होती तेव्हापासून तो वारंवार आत्महत्येसाठी उद्युक्तही झाला होता. त्यामुळे नीरव मोदीचं प्रत्यार्पण झालं तर तो तात्काळ आत्महत्येचा प्रयत्न करु शकतो. तसेच तो मोठ्या डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकतो. त्यामुळेच नीरव मोदीचं प्रत्यार्पणाला कोर्टानं नकार द्यावा, अशी मागणीही मोदीच्या वकिलानं केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT