Gold Toilet Esakal
ग्लोबल

Gold Toilet: सोन्याचं 'टॉयलेट' चोरणारा अखेर ताब्यात; किंमत ऐकून व्हाल चकित

Gold Toilet: अमेरीका नावाचे सोन्याचे आलिशान टॉयलेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Gold Toilet: 'अमेरिका' नावाचे हा आलिशान टॉयलेट 4.8 दशलक्ष पौंड (अंदाजे ₹ 50 कोटींच्या जवळपास) किमतीचा आहे. प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांनी तो तयार केला आहे.

अमेरीका नावाचा सोन्याचे आलिशान टॉयलेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ब्लेनहेम पॅलेसमधून एका व्यक्तीने 48,00000 पौंड (50,36,23939 रुपये) किमतीचे सोन्याचे टॉयलेट चोरल्याची घटना समोर आली आहे. 18-कॅरेट सोन्यापासून बनवलेले टॉयलेट सप्टेंबर 2019 मध्ये एका कला प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांनी ते तयार केले आहे.

द गार्डियनच्या मते, ब्लेनहेम पॅलेस हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे, ज्याला युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थान असण्याचा मान आहे.

वेलिंगबरो येथील जेम्स जिमी शीन याने ऑक्सफर्ड क्राउन कोर्टात चोरी करण्याबाबत, चोरीच्या वस्तू हाताळण्याबाबत आणि चोरीचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.

नॅशनल हॉर्स रेसिंग म्युझियममधील 400,000 किमतीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉफीसह अनेक चोरीसाठी शीन आधीच 17 वर्षांची शिक्षा भोगत आहे. इतर तीन जणांनी शौचालय चोरीशी संबंधित आरोप नाकारले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याच्यावर खटला चालणार आहे.

सोन्याचे शौचालय चर्चेत येण्याची ही पहिलीच घटना नाही. 2019 मध्ये, शांघायमधील दुसऱ्या चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपो (CIIE) मध्ये हाँगकाँगच्या एका ज्वेलर्सने हिऱ्याने जडलेल्या सोन्याच्या टॉयलेटचे अनावरण केले तेव्हा आणखी एक सोनेरी टॉयलेट चर्चेत आले आहे. 12 दशलक्ष युआन म्हणजेच 1.3 दशलक्ष डॉलर्सच्या या विलक्षण टॉयलेटने त्याच्या भव्यतेने लक्ष वेधून घेतले होते. ज्यामध्ये 40,815 लहान हिरे जडलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT