Boris Johnson  Boris Johnson Vladimir Putin russia ukraine crisis
ग्लोबल

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार!

जाणून घ्या ब्रिटनच्या राजकारणात काय घडल्यात घडामोडी

सकाळ डिजिटल टीम

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजच (गुरुवार) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं आता जॉन्सन यांच्यावरही राजीनामा देण्याची वेळ आली आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० मंत्र्यांनी कालच आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तसेच या मंत्र्यांनी राजीनामे देताना पंतप्रधान जॉन्सन यांनाही राजीनामा देण्यास सांगितलं होतं. त्यावर आता जॉन्सन हे राजीनामा देण्यास तयार झाले आहेत. पण ते तातडीनं राजीनामा देणार नाहीत, ते आपल्या कार्यालयाचा कार्यभार तोपर्यंत सोडणार नाहीत जोपर्यंत त्यांची कन्झर्वेटिव्ह पार्टी नव्या नेत्याची निवड करत नाही. जो नेता जॉन्सन यांची पंतप्रधानपदाची जागा घेईल.

मंत्र्यांनी का दिले राजीनामे?

गेल्या ४८ तासात जॉन्सन यांच्या मंत्रिमडळातील ५० हून अधिक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी राजीनामे देताना म्हटलंय की, अनेक घोटाळ्यांमध्ये नाव आल्यानं जॉन्सन हे पंतप्रधानपदावर राहण्यास लायक नाहीत. अशा प्रकारे जॉन्सन यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीमध्ये उघडपणे बंड पुकारण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT