Rishi Sunak vs Liz Truss esakal
ग्लोबल

Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

भारतीय वंशाचे ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय वंशाचे ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत.

लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत. सुनक आणि लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यात अंतिम सामना सुरूय. दरम्यान, युनायटेड किंगडमच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या सुनक (Rishi Sunak) यांचं व्हिडिओ कॅम्पेनमध्ये 'अंडरडॉग' म्हणून वर्णन करण्यात आलंय.

बोरिस जॉन्सनचा (Boris Johnson) उत्तराधिकारी म्हणून ऋषी सुनक यांच्याकडं पाहिलं जातंय. सनक यांची मोहीम टीम लिझ ट्रस विरुद्ध त्यांच्या 'अंडरडॉग' प्रतिमेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच क्रमानं हा नवा कॅम्पेन व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय.

ऋषी सुनक यांच्या प्रचाराच्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही. पण, मी शेवटपर्यंत लढणार आहे.' ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा 5 सप्टेंबरला होणार आहे. पहिले 8 उमेदवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. खासदारांच्या मतदानाच्या पाच फेऱ्यांनंतर भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक ऋषी सुनक यांच्याशिवाय लिझ ट्रस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उरले आहेत.

बोरिस जॉन्सन ऑक्टोबरमध्ये पद सोडणार आहेत. त्याआधी नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. ट्रस आणि सुनक यांच्यामध्ये कोण जिंकणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र, कोण पंतप्रधान पदाचा दावेदार होणार हे 5 सप्टेंबरला कळणार आहे. सध्या लिझ ट्रस पदाच्या दावेदार असल्यातरी ऋषी सुनक यांनी देखील मतं मिळवण्यात चांगलीच मुसंडी मारलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT