UK PM Rishi Sunak Proud Hindu eSakal
ग्लोबल

Rishi Sunak : ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले, मला हिंदू असल्याचा अभिमान! 'जय सिया राम'चा दिला नारा

Rishi Sunak : इथे मी आज एक पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे; असं सुनक म्हणाले.

Sudesh

Britain: मंगळवारी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी अध्यात्मिक नेते मोरारी बापू यांनी 'राम कथा' आयोजित केली होती. या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना सुनक यांनी आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान आहे, असं मत व्यक्त केलं. त्यांनी 'जय सिया राम' म्हणत मोरारी बापूंना प्रणाम केला. सोबतच त्यांनी मोरारी बापू यांच्या व्यासपीठावर पुष्पांजली देखील अर्पण केली.

"इथे मी आज एक पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे. माझ्यासाठी धर्म ही खूप वैयक्तिक बाब आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये धर्म मला मार्गदर्शन करतो. पंतप्रधान बनणं ही सन्मानाची गोष्ट आहे. मात्र, हे काम सोपं नाही. आम्हाला कित्येक कठीण निर्णय घ्यावे लागतात. माझा विश्वासच मला देशासाठी अधिक चांगलं काम करण्याची साहस आणि शक्ती देतो." असं सुनक आपल्या भाषणात म्हणाले.

टेबलावर गणेश मूर्ती

ते पुढे म्हणाले, "मी जेव्हा चान्सलर होतो, तेव्हा 11 डाऊनिंग स्ट्रीटवर दिवाळीसाठी दीप प्रज्वलन करणं हा एक अद्भुत आणि खास क्षण होता. 10 डाऊनिंग स्ट्रीटवर असणाऱ्या माझ्या टेबलवर भगवान गणेशाची एक सोनेरी मूर्ती आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे."

ब्रिटिश आणि हिंदू असण्यावर गर्व

मला एक ब्रिटिश आणि हिंदू असण्यावर गर्व आहे, असं ऋषी सुनक यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या लहानपणीच्या काही आठवणींना उजाळा दिला. आपल्या भावंडांसोबत ते मंदिरात जाऊन पूजा-हवन करत, तसंच प्रसादही वाटत होते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT